स्माईलिंग ब्युटीज...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 10:13 IST
दीपिका पदुकोन हिने तिचा आगामी हॉलीवूडपट ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ झांडर केज’ या चित्रपटात तिचा सेक्सी लूक दाखवलाच ...
स्माईलिंग ब्युटीज...!
दीपिका पदुकोन हिने तिचा आगामी हॉलीवूडपट ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ झांडर केज’ या चित्रपटात तिचा सेक्सी लूक दाखवलाच आहे. आता ती पुन्हा एकदा परतली असून ती काही सामाजिक सोहळ्यांमध्ये ती उपस्थित होती. लवकरच सर्वजण तिला मोठ्या पडद्यावर पाहू शकतील.याअगोदर ती संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात दिसली होती. नुकतीच ती अभिनेत्री रेणुका शहाणे सोबत दिसली. ‘हम आपके हैं कौन’ मधील भाभी असलेल्या रेणुकासोबत तिने सेल्फी काढला असून तो तिने फेसबुकवर पोस्ट केला आहे.तिने हा फोटो ‘मेहमान नवाझी..’ या कॅप्शनखाली पोस्ट केला आहे. लवकरच दीपिका आता आपल्याला दिसेल, यात काही शंकाच नाही.