Join us  

मिस वर्ल्ड 2024 शर्यतीत सिनी शेट्टी सामील, जगाच्या नकाशावर भारताची मान उंचावणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 4:00 PM

'मिस वर्ल्ड 2024' स्पर्धेची उत्सुकता स्पर्धक तरुणींमध्ये पाहायला मिळत आहे.

सध्या सर्वत्र ‘मिस वर्ल्ड 2024’ स्पर्धेची चर्चा सुरु आहे. भारतात 71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची अंतिम फेरी 9 मार्च रोजी जिओ मुंबई कन्वेशनमध्ये होईल. 'मिस वर्ल्ड 2024' स्पर्धेची उत्सुकता स्पर्धक तरुणींमध्ये पाहायला मिळत आहे. अनेक देशातील मॉडेल स्पर्धेत कौशल्य दाखवत स्वतःच्या देशाचं प्रतिनिधित्त्व करताना दिसतील. सिनी शेट्टीने भारताच्या वतीने मिस वर्ल्ड 2024 मध्ये भाग घेतला आहे. आता तिच्याकडून भारतीयांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.  दरवेळेप्रमाणेच ही स्पर्धा अत्यंत चुरशीची होणार आहे.

 सिनी शेट्टीने 2022 मध्ये फेमिना मिस इंडियाचा खिताबही जिंकला होता. मिस वर्ल्डमध्ये सहभागी होण्यासाठी मिस इंडिया स्पर्धा जिंकणे अनिवार्य असल्याचे मानलं जातं. सिनी शेट्टीने याआधीही अनेक विजेतेपदे जिंकली आहेत. सिनी सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे. तिची फॅन फॉलोविंगदेखील मोठी आहे.  सिनी शेट्टी 21 वर्षांची असून ती कर्नाटकची राहणारी आहे. मात्र तिचा जन्म मुंबई येथे झाला. 

सिनी शेट्टीचे शिक्षण मुंबईतूनच झालं. ती केवळ मॉडेलिंगमध्येच नाही तर अभ्यासातही ती हुशार आहे. अकाउंटिंग आणि फायनान्समध्ये बॅचलर डिग्री मिळवली आहे. तिला लहानपणापासून नृत्याची आवड आहे. ती एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना आहे. याशिवाय तिला पेंटिंग, बॅडमिंटन आणि कुकिंगचीही आवड आहे.

मानुषी छिल्लरने २०१७ मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. या स्पर्धेत जगभरातून 120 स्पर्धक सहभागी झाले आहेत. 9 मार्च रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 71 व्या मिस वर्ल्ड ग्लोबल फिनालेचे प्रक्षेपण होईल. स्पर्धेत वेग-वेगळ्या देशातून तब्बल 120 मॉडेल्स स्पर्धेत उतरणार आहेत. ‘मिस वर्ल्ड 2024’ स्पर्धेची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.  

टॅग्स :विश्वसुंदरीसेलिब्रिटीभारत