गायिका श्रेया घोषाल हिला करायचेय २४ तास गायन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2017 15:57 IST
मधुर आवाजाची गायिका आणि मुळची बंगाली गायिका असलेली श्रेया घोषाल हिने बॉलिवूडला अनेक श्रवणीय गाणी बहाल केली. तिचे गायनावर ...
गायिका श्रेया घोषाल हिला करायचेय २४ तास गायन?
मधुर आवाजाची गायिका आणि मुळची बंगाली गायिका असलेली श्रेया घोषाल हिने बॉलिवूडला अनेक श्रवणीय गाणी बहाल केली. तिचे गायनावर एवढे प्रेम आहे की, तिला तिच्या दिवसातील प्रत्येक क्षण हा गाण्यावर खर्च करावासा वाटतो. २४ तास तिला गाणं गायला आवडतं. ती म्हणते,‘मी व्हॅकेशनवर गेले असता मला रियाझ करायला मिळाला नाही तेव्हा मी अतिशय नाराज असते. स्वत:ला मी अपराधी मानते. असे वाटते की, मी या व्हॅकेशनवर यायला नको होते. माझा पती मला म्हणतो की,‘ तू आता थोडासा ब्रेक घ्यायला हवाय. म्हणून आम्ही व्हॅकेशनवर जातो. मात्र, मी तिथे फारशी प्रसन्न असत नाही. केवळ त्याच्या आनंदासाठी मी तिथे जाणे पसंत करते.’ALSO READ : Exclusive! श्रेया घोषाल लवकरच देणार गूड न्यूज‘डोला रे डोला’, ‘बरसो’, ‘राधा’ यासारखी अनेक गाणी गायलेली श्रेया घोषाल सध्या थोडीशी मागे पडली असली तरीही बॉलिवूडच्या सध्याच्या टॉपच्या गायिकांमध्ये तिचेच नाव घेतले जाते. पुढे ती म्हणते,‘मला दिवसातील २४ तास काम करायला आवडतं. मला जेव्हा वेळ असतो तेव्हा मी आत्ममग्न होते आणि विचार करते की, मला जास्त गाणी का मिळत नाहीयेत ते! एका कलाकाराच्या भूमिकेतून मी अतिशय हतबल होते. जर मला गाणी मिळत नसतील तर मी स्वतंत्रपणे माझे संगीत रेकॉर्ड करायला सुरू करू शकते.’ ALSO READ : Exclusive अमितराज आणि श्रेया घोषाल एकत्रित१७ व्या वर्षापासून श्रेयाने गायनाला सुरूवात केली होती. स्टुडिओजमध्ये गाणी रेकॉर्डिंग करणं तिला जास्त आवडतं. पण आजही ती एवढ्या वर्षांनंतर लाईव्ह शोज मध्ये सादरीकरण करताना कमालाची नर्व्हस होते.