Join us

या’ गायकाने म्हटले ‘हम्मा हम्मा’ गाण्याला फालतू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2016 14:38 IST

आगामी रोमॅण्टिक चित्रपट ‘ओक जानू’मधील ‘हम्मा हम्मा’ हे गाणे सध्या कानसेनांच्या पसंतीस उतरत असताना एक व्यक्ती अशी आहे जी ...

आगामी रोमॅण्टिक चित्रपट ‘ओक जानू’मधील ‘हम्मा हम्मा’ हे गाणे सध्या कानसेनांच्या पसंतीस उतरत असताना एक व्यक्ती अशी आहे जी गाण्याच्या नव्या व्हर्जनमुळे प्रचंड नाराज झाली आहे. ही व्यक्ती कोण याचा तुम्ही अंदाज बांधू शकता?ती व्यक्ती म्हणजे मूळ गाण्याचा गायक रेमो फर्नांडिस. त्याच्या मते, या नव्या व्हर्जनमध्ये काहीच नाविन्यता नसून मूळ गाण्याचा आत्मा यामध्ये दिसून येत नाही. गायकाचा आवाज आणि संगीतरचनेच्यादृष्टीने बनवणाऱ्याने अत्यंत घाईघाईने हे गाणे बनवले असे वाटतेय. अत्यंत सुमार दर्जाचे गाणे असेच मी वर्णन करेल.बॉलीवूडमध्ये जुन्या गाण्यांना रिमिक्स आणि रॅपचा तडका देऊन त्याची लोकप्रियता कॅश करण्याचा ट्रेंड आलेला आहे. त्यानुसार ‘बॉम्बे’ (१९९५) चित्रपटातील ‘हम्मा हम्मा’ हे प्रसिद्ध गाणे आदित्य रॉय क पूर व श्रद्धा कपूर स्टारर ‘ओक जानू’मध्ये वापरण्यात आले. रॅप संगीतकार बादशाहने हे गाणे रिमिक्स केले असून तनिष्कने ते गायिले आहे.                           तनिष्क म्हणतो की, ‘गाणे रिलीज झाल्यापासून मला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहे. लहान असताना मी या गाण्यावर डान्स करत असे. त्यामुळे जेव्हा निर्मात्यांनी मला हे गाणे गाण्यासाठी विचारणा केली तेव्हा मी खूप एक्सायटेड झालो. रेहमान सर माझे नेहमीच प्रेरणास्थान राहिलेले आहेत. त्यांचे गाणे मला सादर करायला मिळणार यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी दुसरी नाही.’मूळ आणि नव्या गाण्याची तुलना तर होणारच. याबाबत बादशाह म्हणाला की, ‘नव्या गाण्याचा मूड एकदम वेगळा आहे. तुलना होतेय म्हणून मला काहीच अडचण नाही. किंबाहूना ते मला अपेक्षितही होते. माझ्या पद्धतीने मी पूर्ण मेहनत घेतली आहे. आता लोकांनी त्याला कसा प्रतिसाद द्यायचा हे त्यांच्या हातात आहे. रेहमानच्या सन्मानार्थ मी हे गाणे रिमिक्स केले आहे.’