Join us
Daily Top 2Weekly Top 5

Viral :तो सामने गोली खाउंगा... लाईव्ह कॉन्सर्टमध्ये रॅपर रफ्तार बोलला...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 15:12 IST

होय, रॅपर रफ्तारने हजारो लोकांसमोर सीएए व एनआरसीचा विरोध केला.

 सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी ( एनआरसी) विरोधातील बॉलिवूडमधील अनेक स्टार्स मैदानात उतरले असताना आता सुप्रसिद्ध रॅपर रफ्तार यानेही याविरोधात आवाज उठवला आहे. होय, रॅपर रफ्तारने हजारो लोकांच्या गर्दीसमोर सीएए व एनआरसीचा विरोध केला. लाईव्ह कॉन्सर्टमधील त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. ‘मग माझे करिअर चालो वा ना चालो...,’असे तो या व्हिडीओ म्हणताना दिसतोय.

  लाईव्ह कॉन्सर्ट सुरु असताना अचानक रफ्तार सीएए व एनआरसीवर बोलू लागला आणि सगळ्यांनाच धक्का बसला. ‘ एक गोष्ट मी सीरिअसली क्लीअर करू इच्छितो. मग माझे करिअर चालो वा ना चालो, मला पर्चा नाही. आयुष्यभर जगू शकेल, इतकेच मी कमावले आहे,’ असे तो म्हणतो आणि मग एका व्यक्तिला स्टेजवर बोलवतो. ती व्यक्ती स्टेजवर आल्यावर रफ्तार त्याची ओळख करून देतो.

‘याचे नाव अरशद आहे. तो माझ्या केसालाही धक्का लागू देत नाही. याला कुणी देशाबाहेर काढण्याचे म्हणत असेल तर मी गोळी खायलाही तयार आहे. हिंदू, शिख, ख्रिश्चन, मुस्लिमन सगळेच आपले भाऊ आहेत. मी कुणालाही देशाबाहेर हाकलू देणार नाही. यानंतर माझ्या करिअरचे जे होईल, ते तुम्ही बघालच. पण मला याची जराही पर्वा नाही,’ असे रफ्तार यानंतर म्हणतो. मी स्टेजवर परफॉर्म करायला येतो, तेव्हा तुम्ही मला माझा धर्म विचारू शकत नाही. पण आज मला माझ्याच देशात माझा धर्म काय असा प्रश्न विचारला जातोय. हा देश कुणाच्या बापाचा नाही..., असेही तो पुढे म्हणाला.

टॅग्स :नागरिकत्व सुधारणा विधेयक