Join us

या गायकाने एका दिवसात २८ गाणी रेकॉर्ड केली आहेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 09:18 IST

एखादा गायक एका दिवसांत किती गाणी रेकॉर्ड करू शकतो असे तुम्हाला कोणी विचारले तर तुम्ही याचे उत्तर काय द्याल? ...

एखादा गायक एका दिवसांत किती गाणी रेकॉर्ड करू शकतो असे तुम्हाला कोणी विचारले तर तुम्ही याचे उत्तर काय द्याल? गाणे रेकॉर्ड करताना अनेकवेळा तालमी कराव्या लागतात. तसेच अनेक रिटेक होतात. त्यामुळे एक गाणे रेकॉर्ड करायला देखील खूप वेळ लागतो. त्यामुळे एक गायक एका दिवसात जास्तीत जास्त तीन-चार गाणी रेकॉर्ड करू शकतो. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण एका गायकाने एका दिवसात तब्बल २८ गाणी रेकॉर्ड केली होती आणि यासाठी गिनीज बुकमध्ये या गायकाच्या नावाचा समावेश देखील करण्यात आला आहे. हा गायक म्हणजे कुमार सानू.कुमार सानू यांनी नव्वदीचे दशक अक्षरशः गाजवले होते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या काळात त्यांनी एकाहून एक हिट गाणी बॉलिवूडला दिली. तुझे देखा तो, दो दिल मिल रहे है, सोचेंगे तुम्हे प्यार, मेरा दिल भी कितना पागल, तू मेरी जिंदगी है, तू प्यार है किसी और का, कुछ ना कहो अशी त्यांची अनेक गाणी रसिकांनी डोक्यावर घेतली आहे. नव्वदीच्या दशकातील सगळ्यात यशस्वी गायकांमध्ये त्यांची गणना केली जाते. त्या काळात ते अनेक चित्रपटांमध्ये गात असत. तसेच त्या प्रत्येक चित्रपटांमध्ये त्यांची अनेक गाणी असत. त्यामुळे त्यांचे अनेक दिवस रेकॉर्डिंग मध्येच जात असत. काही वेळा ते एका दिवसांत अनेक गाणी रेकॉर्ड करत असत. त्यांनी एका दिवसांत जवळजवळ २८ गाणी रेकॉर्ड केली असून यासाठी गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावाची नोंद देखील करण्यात आलेली आहे.