सिद्धार्थला हवाय कामातून ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2016 23:47 IST
बॉलिवूड सेलिब्रेटींची लाईफ खूपच धावपळीची असते. शूटिंगच्या शेड्युलमुळे त्यांना कधीकधी तर वेळही मिळत नाही. चित्रपट प्रदर्शित होत असेल तर ...
सिद्धार्थला हवाय कामातून ब्रेक
बॉलिवूड सेलिब्रेटींची लाईफ खूपच धावपळीची असते. शूटिंगच्या शेड्युलमुळे त्यांना कधीकधी तर वेळही मिळत नाही. चित्रपट प्रदर्शित होत असेल तर प्रमोशनसाठी देशभराचा फेरफटका, विविध शोमध्ये हजेरी लावणे हे सारे आलेच. मग सुटीला एन्जॉय करायचे कधी असा प्रश्न या स्टार्सना पडतोच. मग काय शूटिंगमधून ब्रेक घेऊनच आपल्या आवडीच्या ठिकाणी फिरायला जायचे. असेच काही अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने ठरविले आहे. तो शूटिंगमधून ब्रेक घेऊन न्यूझिलंडला फिरायला जाण्याच्या तयारीत आहे. सध्या तो जॅकलिन फर्नाडिझसोबत एका चित्रपटाची शूटिंग करतो आहे. यावर्षी त्याच्या ‘बार बार देखो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात त्याच्या अभिनयाची प्रसंशा झाली खरी मात्र बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट काही खास करू शकला नाही. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सिद्धार्थ जॅकलिनसोबतच्या चित्रपटात व्यस्त झाला. यामुळे त्याला यावर्षी स्वत:साठी वेळच काढता आला नाही. यामुळे त्याने व्हॅकेशनवर जाण्याचे ठरविले आहे. यासाठी तो कुणाची वाट पाहणार नाही. वेळ पडल्यास तो एकटाच या सहलीचा आनंद घेण्याचे त्याने ठरविले आहे. एका संकेतस्थळावर त्याच्या या व्हॅकेशनची बातमी प्रसिद्ध झाली आहे. तो म्हणतो, मी गेल्यावर्षी न्यूझिलंडला गेलो होतो. हा प्रवास आजही माझ्या आठवणीत आहे. अविश्वसनीय नैसर्गिक सौंदर्यांने नटलेल्या न्यूझिलंडमध्ये धावपळ नाही की कामाचा ताण नाही. येथे आल्यावर जगापासून फार दूर आल्यासारखे वाटते. मी लवकरच या रोमांचक यात्रेवर जाणार आहे. कामातून ब्रेक घेणे आता गरजेचे झाले आहे असेच त्याला म्हणायचे असेल. सिद्धार्थने या आधीच्या न्यूझिलंड प्रवासादरम्यान अनेक गोष्टी अनुभवल्या होत्या यात पारंपरिक माओरी युद्ध नृत्यात तो सहभागी झाला होता व सुमारे 1500 फुट उंचीहून त्याने स्काय डायव्हिंग केले होते. यावेळी मी आणखी नवा अनुभव घेण्याची योजना आखणार आहे असेही तो म्हणाला.