Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ सिद्धार्थने दिली कॅटवरच्या ‘प्रेमाची’ कबुली!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 21:17 IST

बॉलिवूडमध्ये यायच्या आधीपासून कॅटरिना कैफ ही सिद्धार्थ मल्होत्राची आवडती हिरोईन होती. कॅटरिनासोबत काम करायला मिळेल, अशी कल्पनाही सिद्धार्थने कधी ...

बॉलिवूडमध्ये यायच्या आधीपासून कॅटरिना कैफ ही सिद्धार्थ मल्होत्राची आवडती हिरोईन होती. कॅटरिनासोबत काम करायला मिळेल, अशी कल्पनाही सिद्धार्थने कधी केली नव्हती. पण प्रत्यक्षात सिद्धार्थला कॅटसोबत काम करण्याची संधी मिळाली. ‘बार बार देखो’या आगामी चित्रपटात कॅट व सिड एकत्र दिसणार आहे. कॅटसोबत काम, आॅनस्क्रीन किस हे सगळे सिद्धाार्थसाठी स्वप्न सत्य झाल्यासारखेच  म्हणायला हवे. आता अशास्थितीत कॅटबद्दल वाटणारे प्रेम आणखी तीव्र होईलच ना. अगदी तसेच झालेय. हे आम्ही नाही तर खुद्द सिद्धार्थ म्हणतोय. एका मुलाखतीत सिद्धार्थने ही कबुली दिली. ‘जेव्हा तुम्ही कॅटरिनासारख्या को-स्टार्सच्या संपर्कात येता तेव्हा तुम्हाच्या तिच्याबद्दल  वाटणाºया भावनांची तीव्रता वाढतच जाते,’असे सिद्धार्थ म्हणाला. सिद्धार्थने कदाचित प्रथमच कुठल्या अभिनेत्रीबद्दल अशा भावना बोलून दाखवल्यात. आता निश्चितपणे या संपूर्ण चित्रात आलिया कुठेही नाही. तेव्हा आलिया सावध हो बाई!!