Join us

सिद म्हणतो,‘...तर आलियासोबत डयूएट गाणार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 12:38 IST

श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांचा रोमँटिक चित्रपट ‘आशिकी २’ ने उत्तम संगीत, स्टारकास्ट यासाठी रेकॉर्ड ब्रेक केले. ...

श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांचा रोमँटिक चित्रपट ‘आशिकी २’ ने उत्तम संगीत, स्टारकास्ट यासाठी रेकॉर्ड ब्रेक केले. आता आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे दोघे मुख्य भूमिकेत असलेला ‘आशिकी’चा तिसरा सिक्वेल येणार असून महेश भट्ट चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.एका अ‍ॅड शूटसाठी सिद आला असता तो म्हणाला,‘ चित्रपटाच्या स्क्रिप्टचे लेखन सुरू आहे, आणि आशिकी २ पेक्षाही हटके असणार, सर्वांना खुप आवडेल. दिग्दर्शक मोहित सुरी याला वाटते की, मी देखील एखादे गाणे म्हणावे.पण, असे वाटतेय की,‘आलियासोबत मला ड्यूएट म्हणावे लागणार आहे. बहुतेक आम्ही दोघेही पहिल्यांदाच ड्यूएट म्हणतो आहोत.