Join us
Daily Top 2Weekly Top 5

'शूर आम्ही सरदार' सिनेमा २१ एप्रिलपासून रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2017 17:43 IST

गेल्या काही वर्षापासून परदेशात स्थायिक झालेले भारतीय निर्माते बनत नवी इनिंग सुरू केल्याचे पाहायला मिळत आहेत. आपले मराठीविषयी असेलेल ...

गेल्या काही वर्षापासून परदेशात स्थायिक झालेले भारतीय निर्माते बनत नवी इनिंग सुरू केल्याचे पाहायला मिळत आहेत. आपले मराठीविषयी असेलेल प्रेम त्यांनी मराठी सिनेमा बनवत दाखवून देत आहेत. त्या प्रेमापोटीच निर्मिती, लेखन, अभिनय अशा माध्यमातून काही भारतीय  मराठी  सिनेमाशी जोडले जात आहेत.  ऑस्ट्रेलियास्थित गणेश लोके यांनी पुढाकार घेऊन दहशतवादावर आधारित 'शूर आम्ही सरदार' या सिनेमाची निर्मिती केली आहे केली आहे. येत्या २१ एप्रिलला  हा सिनेमा रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.दहशवादाविरोधात लढा देण्यासाठी एकत्र आलेले तीन तरूण काय करतात, त्यांना दहशवादाविरोधात काम करण्यात यश येतं का या आशयसूत्रावर हा सिनेमा  आधारित आहे. दहशतवादासारखा संवेदनशील विषय मराठी सिनेमात बऱ्याच काळानंतर हाताळण्यात आले आहे. गणेश लोके यांनी या चित्रपटात चौफेर जबाबदारी निभावली आहे. त्यांनी सिनेमाचं लेखन, प्रमुख भूमिका,सहदिग्दर्शन आण निर्मिती केली आहे. इंडो ऑस एंटरटेन्मेंट, झुमका फिल्म्स, सासा प्रॉडक्शनच्या डॉ. प्रज्ञा दुगल, श्वेता देशपांडे आणि गणेश लोके यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.प्रकाश जाधव यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.सिनेमात गणेश लोके यांच्यासह अभिनेते सयाजी शिंदे, भारत गणेशपुरे,संजय मोने, शंतनू मोघे असे  दिग्गज कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.गणेश लोके गेली १७ वर्षं ऑस्ट्रेलियात वास्तव्याला आहेत. उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. २०१३ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियन नागरिक म्हणून ऑस्ट्रेलियन फेडरल निवडणूकही लढवली होती.मराठी भाषा,मराठी सिनेमावरील प्रेमापोटी त्यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. यापूर्वी त्यांनी अयुब खानची प्रमुख भूमिका असलेल्या सरफरोशी या हिंदी देशभक्तीपर सिनेमाचीही निर्मिती केली होती.'चित्रपट निर्मिती ही माझे पॅशन आहे. सामाजिक संदेश असलेले, देशभक्ती जागृत करणारे सिनेमा करण्यात मला विशेष रस आहे.तरूणांनी समाजासाठी काहीतरी योगदान द्यावं यासाठी प्रोत्साहन देणं मला महत्त्वाचं वाटते असं गणेश लोके यांनी यावेळी सांगितले.