Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिलेशनशीपबाबत पहिल्यांदा बोलली श्रुती हसन म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 16:27 IST

श्रुतीने एका चॉट शोमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत

अभिनेत्री श्रुती हासन तिच्या सिनेमांपेक्षा तिच्या पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत असते. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार श्रुतीने एका चॉट शोमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. श्रुतीला या वेळी तिच्या करिअरच्या सुरुवातीला प्रेम आणि रिलेशनशीपबाबत तुझे काय विचार होते ?,  श्रुतीने सांगितले की, करिअरच्या सुरुवातील मी कुल होते. मी खूप निरागस होते आणि प्रत्येकजण माझ्यावर हुकुम चालवायचे. पण मी म्हणने, हा अनुभव माझ्यासाठी चांगला होता. श्रुती पुढे म्हणाली, आजपण त्याचा कोणता फॉर्म्युला नाही. मी खूप गोष्टी शिकले आहे. पण मला नेहमीच खऱ्या प्रेमाच्या शोधात राहिले.

अभिनेता कमल हसन यांची मुलगी श्रुती हसन हिने दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीपासून बॉलिवूडमध्ये आपली छाप उमटवली आहे. ती जास्त सिनेमात झळकली नसली तरी तिचा फॅन फॉलोविंग खूप आहे. श्रुती अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही सहभाग घेताना दिसते. नुकताच तिने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. तिने या कार्यक्रमात सांगितलं की, बॉलिवूड इंडस्ट्रीसारखंच दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतही स्त्री पुरूष असा भेदभाव केला जातो. 

एका वाहिनीशी बोलताना श्रुती हसनने सांगितलं की, ''असं नाही आहे की फक्त बॉलिवूडमध्येच अभिनेत्रींना कमी मानधन मिळतं. तर दाक्षिणात्य सिनेमातही असंच चित्र आहे. तिथेदेखील अभिनेत्याना अभिनेत्रीपेक्षा जास्त मानधन व सुविधा मिळते. मला आशा आहे की आगामी काळात महिलांना समान वर्तणूक व मानधन मिळेल.''

टॅग्स :श्रुती हसन