Join us

​तमन्नासाठी गाणार श्रुती हसन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2016 19:49 IST

होय, कमल हसनची लाडकी लेक श्रुती हसन ही अभिनेत्रीच नाही तर गायिकाही आहे. आता श्रुती तमन्ना भाटिया हिच्यासाठी गाणार ...

होय, कमल हसनची लाडकी लेक श्रुती हसन ही अभिनेत्रीच नाही तर गायिकाही आहे. आता श्रुती तमन्ना भाटिया हिच्यासाठी गाणार आहे. तमन्ना लवकरच ‘काथी संदई’ या तामिळ विनोदी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तमन्नासाठी श्रुती पार्श्वगायन करणार आहे.  दिग्दर्शक सूरज यांना या गाण्यासाठी श्रुतीचाच आवाज हवा होता आणि त्यामुळेच त्यांनी श्रुतीला तशी गळ घातली. श्रुतीनेही सूरज यांना लगेच होकार दिला. आता लवकरच श्रुती या गाण्याचे रेकॉर्डिंग करणार आहे. हे गाणे तमन्नावर चित्रीत करण्यात येणार आहे. आता श्रुतीच्या आवाजात स्वरबद्ध झालेले हे गाणे ऐकायचे तर तुम्हाला दिवाळीची प्रतीक्षा करावी लागेल. कारण दिवाळीच्या मुहूर्तावर २८ आक्टोबरला हा चित्रपट रिलीज होतोय.