श्रुती हासनने आई सारिकाशी घालून दिली बॉयफ्रेन्ड मायकेल कोर्सेलची भेट! पाहा, फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 11:09 IST
अभिनेता कमल हासन यांची लेक आणि अभिनेत्री सारिका यांची बिनधास्त अन् बोल्ड लेक अभिनेत्री श्रुती हासन कदाचित एका मोठ्या ...
श्रुती हासनने आई सारिकाशी घालून दिली बॉयफ्रेन्ड मायकेल कोर्सेलची भेट! पाहा, फोटो!!
अभिनेता कमल हासन यांची लेक आणि अभिनेत्री सारिका यांची बिनधास्त अन् बोल्ड लेक अभिनेत्री श्रुती हासन कदाचित एका मोठ्या निर्णयाप्रत येऊन पोहोचली आहे. हा निर्णय कुठला तर, जोडीदार निवडण्याचा. होय, श्रुती दीर्घकाळापासून लंडनस्थित अभिनेता मायकल कोर्सेल याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. श्रुतीचे पापा कमल हासन यांना श्रुतीच्या या रिलेशनबद्दल सगळेच माहित आहे आणि आता कदाचित आई सारिका हिनेही श्रुतीला या नात्यासाठी संमती दिली आहे. काल संध्याकाळी श्रुती तिच्या दोन आवडत्या व्यक्तींसोबत दिसली आणि मग बातमी झाली. या दोन आवडत्या व्यक्ती कोण तर एक म्हणजे मायकेल आणि दुसरी म्हणजे तिची आई सारिका. हे तिघेही काल एकत्र दिसले. या तिघांकडे बघून ‘हॅपी फॅमिली’ यापेक्षा वेगळी नसते, असेच कुणालाही वाटेल. तिघेही एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना एकत्र दिसले. यावेळी श्रुतीने पांढी-या रंगाचा मॅक्सी ड्रेस घातला होता. कानात म्हणायला साजेसे इअररिंग्स होते. पण श्रुतीचा लूक अतिशय कॅज्युअल होता. सारिकाच्या हाती एक सुंदर पुष्पगुच्छ होता. निश्चितपणे मायकेलने तो सारिकाला दिला असावा. यावेळी मायकेलच्या हातात सॉफ्ट ड्रिंक्सच्या काही बॉटल्सही दिसल्या. यावरून तिघांचाही आणखी मोठा प्लान असावा. एकंदर काय तर श्रुतीने मायकेलची आईशी भेट घालून दिली. आता केवळ या नात्याच्या औपचारिक घोषणेची तितकीच देरी म्हणायला हवी. ALSO READ : OMG !! प्रमोशनल इव्हेंटमध्ये श्रुती हासनसोबत घडले कल्पनेपलीकडे असे काही! श्रुती आपल्या अदा आणि बोल्ड लूकमुळेकायमच चर्चेत असते. याशिवाय आपल्या रिलेशनशिपमुळेही श्रुती गॉसिप कॉर्नरवर हिट ठरत आलीयं. साऊथचा अभिनेता सिद्धार्थसोबत श्रुतीचे अफेअर होते. त्यानंतर श्रुती आणि सिद्धार्थ लिव्ह-इनमध्ये राहत असल्याच्याही चर्चा होत्या. त्यातच मध्यंतरी एका अनोळखी व्यक्तीसोबतचे श्रुतीचे फोटो व्हायरल झाले होते. ही अनोळखी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून मायकेल होती. मायकेलसोबतचे तिचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. यावरून कमल हासन नाराज असल्याचे वृत्तही आले होते.