Join us

टॅटू दाखवायचा होता म्हणून श्रुती हसन झाली Topless; याचा अर्थही आहे खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 15:01 IST

साऊथचा सुपरस्टार कमल हसनची मुलगी श्रुती हसनने बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.  तेलुगू आणि तमिळ तसेच हिंदी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे.

अभिनेत्री श्रुती हसन सोशल मीडियावर खूप सक्रीय असते आणि ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. याशिवाय ती नेहमी सोशल मीडियावर फोटोही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना दिसते. अनेकदा ती स्वतःशी संबंधित गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत चर्चेत असते. पुन्हा एकदा श्रुती हसन चर्चेत आली आहे. चर्चेत येण्यास कारणीभूत ठरला आहे. तिचा बोल्ड फोटो.नुकताच श्रुतीने इंस्टाग्रामवर तिचा बोल्ड फोटो शेअर केला आहे.

मुळात सिनेस्टार्सचं टॅटूप्रेम ही जगजाहीर आहे. त्यात अनेकदा अभिनेत्री हातावर पायावर हटके डिझाईन असलेले टॅटू काढत लक्ष वेधून घेत असतात. अशाच हटके टॅटूमुळे अभिनेत्री श्रुती हसनही चर्चेत आली आहे. तिने पाठिवर हटेक डिझाईन असलेला टॅटू बनवला आहे. आता टॅटू काढल्यानंतर तिने तिचा फोटो शेअर केला. मुळात फोटो पाठीवर काढल्यामुळे यासाठी ती टॉपलेसही झाली होती. टॉपलेस फोटो शेअर करत तिने तिचा हा खास टॅटू फ्लॉन्ट केल्याचे पाहायला मिळतंय. 

श्रुतीच्या या फोटोने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. मुळात श्रुतीने काढलेल्या टॅटूमध्ये खास अर्थही दडला आहे. टॅटूच्या रुपात तिने  तमिळ भाषेत तिचं नाव लिहिलं आहे. श्रुतीच्या या फोटोला अनेक लाइक्स मिळाले असून, यावर कमेंट करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. श्रुतीने फोटो शेअर केल्यापासून टॅटूवरच चाहत्यांचे लक्ष खिळल्या आहेत.

साऊथचा सुपरस्टार कमल हसनची मुलगी श्रुती हसनने बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.  तेलुगू आणि तमिळ तसेच हिंदी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. हिंदी सिनेमात तिला हवे तसे यश मिळाले नाही. पण दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे अभिनयातच नाहीतर गायनातही तिला प्रचंड रस आहे. श्रुती एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम गायिका देखील आहे.

कमल हसनची मुलगी असूनही श्रुतीला इंडस्ट्रीत येण्यासाठी प्रचंड स्ट्रगल करावे लागले आहे. अभिनय क्षेत्रात येण्याआधी श्रुती  मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये गात असे. मुंबईत तिला कोणीही ओळखत नसल्यामुळे ती रेस्टाँरटमध्ये नोकरी करु शकली. ती कोण आहे? कोणाची मुलगी आहे ? याविषयीची कमालीची गुप्तता तिने पाळली होती. आज श्रुतीचे चाहते सर्वत्र आहेत. प्रचंड मोठा तिचा चाहता वर्ग आहे.  

टॅग्स :श्रुती हसनकमल हासन