Join us  

‘दृश्यम’ फेम श्रिया सरन वर्षभरापूर्वीच बनली आई; आत्ता कुठे केला खुलासा, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 10:25 AM

Shriya Saran Blessed With a Baby Girl : श्रिया सरनने इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. सोबतच एक पोस्टही लिहिली आहे

ठळक मुद्देश्रिया सरन ही साऊथची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तसेच तिने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे.

अभिनेत्री श्रिया सरनने (Shriya Saran)आत्ता कुठे खुलासा केला आहे. होय, तिच्या खुलाशाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. श्रिया वर्षभरापूर्वी आई बनली. मात्र आत्ता तिने या गोष्टीचा खुलासा केला आहे. (Shriya Saran Blessed With a Baby Girl) तिने इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. सोबतच एक पोस्टही लिहिली आहे. व्हिडीओत ती तिची मुलगी व पतीसोबत दिसतेय. कॅप्शनमध्ये ती लिहिते, ‘जेव्हा देश कोरोना महामारीशी लढत होता. तेव्हाच माझं आयुष्य बदललं होतं. याचदरम्यान मी एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि आमचं आयुष्यचं बदलून गेलं. आमच्या आयुष्यात उत्सुकता, जबाबदारी, थ्रिल या सर्व गोष्टी एकदमच आल्या. या गोष्टीसाठी देवाला धन्यवाद म्हणू इच्छिते’.

2018 मध्ये श्रियाने रशियन बॉयफ्रेन्ड आंद्रेई कोशेवसोबत (Andrei Koscheev) लग्नगाठ बांधली होती. दोघांचीही भेट मालदीवमध्ये झाली होती. लग्नानंतर श्रिया तिच्या पतीसोबत बर्सिलोनामध्ये राहत होती. मात्र 2020 मध्येच तिने भारतात परतण्याचा निर्णय घेतला होता. तथापि लॉकडाऊनदरम्यान दोघेही बार्सलोनामध्ये अडकून पडले होते. आता मात्र ती व तिचे कुटुंब  मुंबईमध्ये परतले आहे.  

श्रिया सरन ही साऊथची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तसेच तिने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. ‘इशितम’ या तेलगू चित्रपटापासून श्रियाने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात केली होती. यानंतर 2002 मध्ये ‘संतोषाम’ हा तिचा दुसरा चित्रपट आला. या चित्रपटाने बम्पर कमाई केली होती. 2007 मध्ये   ‘शिवाजी द बॉस’ या तिच्या  चित्रपटानेही रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटात तिच्या अपोझिट मेगास्टार रजनीकांत दिसले होते. याच वर्षात आलेला तिचा ‘आवारापन’ हा चित्रपटही गाजला होता. बॉलिवूडमध्ये अजय देवगनसोबत ‘दृश्यम’ या सिनेमात ती झळकली. या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये तिला नवी ओळख दिली. लवकरच ती  राम चरण आणि जूनियर एनटीआरसोबत ‘आरआरआर’मध्ये झळकणार आहे.

टॅग्स :श्रिया सरनबॉलिवूड