श्रद्धा म्हणाली, होय, मी ‘लिव्ह इन’मध्ये आहे. पण...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2017 15:06 IST
श्रद्धा कपूर सध्या चर्चेत आहे ती फरफान अख्तरसोबतच्या लिंकअपच्या बातम्यांमुळे. श्रद्धा फरहानसोबत लिव्ह-इनमध्ये राहत असल्याची बातमी मध्यंतरी आली. यानंतर ...
श्रद्धा म्हणाली, होय, मी ‘लिव्ह इन’मध्ये आहे. पण...!!
श्रद्धा कपूर सध्या चर्चेत आहे ती फरफान अख्तरसोबतच्या लिंकअपच्या बातम्यांमुळे. श्रद्धा फरहानसोबत लिव्ह-इनमध्ये राहत असल्याची बातमी मध्यंतरी आली. यानंतर धडकली ती एक शॉकिंग बातमी. ती म्हणजे श्रद्धाचे पिता अर्थात शक्ती कपूर यांनी श्रद्धाला फरहानच्या घरून फरफटत घरी नेल्याची. या बातमीने बॉलिवूडमध्ये एकच खळबळ माजली. अर्थात ही बातमी मीडियात आल्यानंतर काही तासांतच शक्ती कपूर यांनी या बातमीचा इन्कार केला. असे काहीही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. श्रद्धा मात्र यावर कमालीची चुप्पी साधून राहिली. पण कदाचित ही बातमी ऐकून आणखी गप्प बसणे, तिलाही जमले नसावे. त्यामुळे आता तिनेही यासंदर्भात खुलासा केलाय. काय? तर ती ‘लिव्ह इन’मध्ये हे तिने कबुल केलेय. धक्का बसला ना? पण श्रद्धा पुढे काय म्हणाली ते तर ऐका.श्रद्धा म्हणाली,‘माझ्याबद्दल असे गॉसिपिंग होत असलेले मला कळले आणि सर्वप्रथम मला हसूच आले. यापूर्वी मला आदित्य राय कपूरसोबतही लिंकअप केले गेले. कदाचित बॉलिवूड कलाकारांना कुणा ना कुणासोबत लिंक केले जाणारच. पण यात नाहक माझ्या आई-वडिलांना ओढले जात असेल तर ते जरा अतिच म्हणावे लागेल. खरे तर होय, मी लिव्ह इनमध्ये आहे. पण माझ्या आई-वडिलांसोबत. आम्ही कलाकारही मनुष्य आहोत, हे अनेकदा लोक विसरतात. आमच्या पर्सनल लाईफबद्दलच्या बातम्यांना गॉसिप्स म्हटले जाते आणि लोकांचे यामुळे मनोरंजन होते, हे मला ठाऊक आहे. पण गोष्ट माझे पालक, माझी मावशी व माझ्या कुण्या को-स्टारपर्यंत येत असेल तर ते चुकीचे आहे. पण असो, या गोष्टींनी मला काहीही फरक पडत नाही. कारण मुळातच या सर्व गोष्टी बकवास आहेत’