Join us

हसीना पारकर बायोपिकमधील श्रद्धा कपूरचा लूक लाँच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 18:00 IST

अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सध्या आगामी ‘हाफ गर्लफ्रेंड’ आणि ‘ओके जानू’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आत्तापर्यंतच्या कारकीर्दीत तिने सर्वाधिक ...

अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सध्या आगामी ‘हाफ गर्लफ्रेंड’ आणि ‘ओके जानू’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आत्तापर्यंतच्या कारकीर्दीत तिने सर्वाधिक रोमँटिक भूमिकाच साकारल्या आहेत. मात्र, आता ती एका आव्हानात्मक भूमिकेत लवकरच दिसणार आहे. ‘हसीना : द क्वीन आॅफ मुंबई’ या बायोपिकमध्ये अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिच्या भूमिकेत दिसेल. श्रद्धा ही प्रथमच बायोपिकसाठी काम करतेय. नुकताच तिचा चित्रपटातील लूक लाँच करण्यात आला आहे. या लूकमध्ये ती अतिशय डी-ग्लॅमराईज दिसते आहे.                                                   ‘हसीना पारकर बायोपिक’ मधील लाँच झालेला श्रद्धा कपूरचा फर्स्ट लुकसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,‘ श्रद्धा ही हसीनाची भूमिका एकदम साधी आणि खरी दिसण्यासाठी तत्कालिन काही दागिने घालणार आहे. मेकअप हा केवळ साधारण स्वरूपाचा असेल. वयाच्या १७ ते ४३ या वयोगटापर्यंतचा हसीनाचा प्रवास या बायोपिकमध्ये दाखवण्यात येईल. श्रद्धा प्रथमच बायोपिकमध्ये काम करत असल्याने ती फारच उत्साहित आहे. हसीनाचे आयुष्य जाणून घेण्यासाठी ती तिच्या कुटुंबियांनाही भेटली. बेस्ट शॉट देण्यासाठी ती प्रचंड मेहनत घेतेय. ती तिचा भाऊ सिद्धांत कपूर याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार असून, तो दाऊद इब्राहिमची भूमिका साकारणार आहे. अपूर्वा लाखिया या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत.’ श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या मुख्य भूमिकेतील ‘हाफ गर्लफे्रंड’ या चित्रपटाची शूटिंग संपली असून, आता चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. लवकरच चित्रपटातील पोस्टर्स, गाणी, ट्रेलर लाँच करण्यात येतील. मोहित सुरी दिग्दर्शित हा चित्रपट लेखक चेतन भगत याच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ आधारित आहे.