Join us

​श्रद्धा कपूरचा ‘हसीना पारकर’ का लांबतोय? वाचा खरे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 14:50 IST

श्रद्धा कपूरच्या ‘हसीना पारकर’ या आगामी चित्रपटाची लोक आतूरतेने प्रतीक्षा करत आहेत. पण आत्तापर्यंत तिनदा या चित्रपटाची रिलीज डेट ...

श्रद्धा कपूरच्या ‘हसीना पारकर’ या आगामी चित्रपटाची लोक आतूरतेने प्रतीक्षा करत आहेत. पण आत्तापर्यंत तिनदा या चित्रपटाची रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आलीय आणि आता अखेर या चित्रपटाला २२ सप्टेंबरचा मुहूर्त मिळाल्याचे कळतेय. निश्चितपणे ही बातमी श्रद्धाच्या चाहत्यांच्या जीवात जीव आणणारी आहे. पण तरिही  एक प्रश्न उरतोच. तो म्हणजे, शेवटी  मेकर्सला एकदा नाही, दोनदा नाही तर तिनदा  रिलीज डेट पुढे का ढकलावी लागली? दिग्दर्शक अपूर्व लखिया यांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेय.अपूर्व लखिया यांचे मानाल तर बॉक्स आॅफिस क्लॅश, हे यामागचे खरे कारण आहे. सर्वप्रथम गत १४ जुलैला हा चित्रपट रिलीज होणार होता. पण या तारखेला या चित्रपटाला रणबीर कपूर व कॅटरिना कैफ यांच्या ‘ जग्गा जासूस’सोबत मुकाबला करावा लागला असता. यानंतर चित्रपटसाठी २८ जुलै ही तारिख ठरवण्यात आली. पण या तारखेलाही ‘मुबारकां’,‘इंदू सरकार’ आणि ‘राग देश’ या चित्रपटांशी ‘हसीना पारकर’चा संघर्ष अटळ होता. त्यामुळे पुन्हा तारिख पुढे ढकून ती १८ आॅगस्ट केली गेली. पण ११ आॅगस्टला रिलीज झालेल्या शाहरूख खान व अनुष्का शर्माचा ‘जब हॅरी मेट सेजल’ आणि अक्षय कुमारचा ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ या दोन चित्रपटांशी ‘हसीना पारकर’ला चार हात करावे लागले असते. यामुळे ही रिलीज डेटही टळली. त्यामुळे आता ‘हसीना पारकर’च्या रिलीजसाठी २२ सप्टेंबर ही तारिख लॉक करण्यात आली आहे, असे लखिया सांगत आहेत. पण आमचे मानाल तर हे पूर्ण सत्य नाही.खरे कारण काही वेगळेच आहे. सूत्रांचे मानाल तर श्रद्धा कपूर ही रिलीज डेट पुढे ढकलण्यामागचे कारण असल्याचे कळतेय. श्रद्धाने म्हणे या चित्रपटात काही बदल सुचवले. तिने सुचवलेल्या बदलानुसार काही सीन रिशूट करण्यात आले. आपण इंडस्ट्रीतील काही लोकांना चित्रपटाचे काही सीन्स दाखवले. त्यांनी त्यात काही बदल सुचवलेत, असे श्रद्धाने लखियांच्या गळी उतरवले. आता श्रद्धाचे हे मित्र कोण? हे मात्र आम्हाला ठाऊक नाही. काय म्हणतायं? फरहान अख्तर? आता फरहान की आणखी कोण, हे तर श्रद्धालाच ठाऊक!