Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा कपूरकडे नाही ‘या’ गोष्टीसाठी वेळ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 12:33 IST

श्रद्धा सध्या कमालीची बिझी आहे. इतकी की, तिच्याकडे स्वत:साठीही वेळ नाही. प्रेम, रिलेशनशिप, डेट यासाठी तर नाहीच नाही. 

‘स्त्री’ या सुपरडुपर हिट चित्रपटानंतर श्रद्धा कपूर सध्या ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. सोबतसोबत ‘साहो’ या चित्रपटाचे तिचे शूटींगही सुरू आहे. हे दोन्ही चित्रपट हातावेगळे होत नाही तोच, श्रद्धा एका बायोपिकमध्ये बिझी होतेय. साहजिकचं श्रद्धा सध्या कमालीची बिझी आहे. इतकी की, तिच्याकडे स्वत:साठीही वेळ नाही. प्रेम, रिलेशनशिप, डेट यासाठी तर नाहीच नाही. होय, स्वत: श्रद्धानेच याचा खुलासा केला. प्रेम, रिलेशनशिप या गोष्टीसाठी सध्या तरी माझ्यासाठी शक्य नाही. कारण रिलेशनशिप म्हटल्यानंतर समोरच्या व्यक्तिला आपला पूर्ण वेळ देणे मला महत्त्वाचे वाटते. माझ्याकडे हेच नाही. त्यामुळे सध्या तरी रिलेशनशिप माझ्यासाठी शक्य नाही, असे श्रद्धा अलीकडे म्हणाली.श्रद्धा सायना नेहवाल हिच्यावरील बायोपिकच्या तयारीत बिझी आहे. यासाठी ती बॅडमिंटन शिकतेय. यासाठी रोज सकाळी ६ वाजता उठून तिची प्रॅक्टिस सुरू होते. कामातून काही काळ ब्रेक मिळालाच तर काय करशील, असे विचारले असता, काही गोव्यातील हॉली डे होममध्ये राहून रिलॅक्स व्हायला मला आवडेल, असे ती म्हणाली. श्रद्धाने अलीकडे हे हॉलीडे होम खरेदी केले आहे.मध्यंतरी श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तर यांच्या रिलेशनशिपची बरीच चर्चा झाली होती. दोघेही लिव्हइनच्या निर्णयापर्यंतही पोहोचले होते. पण श्रद्धाच्या वडिलांचा या नात्याला विरोध होता. वडिलांखातर श्रद्धानेच माघार घेतली आणि फरहानसोबत तिचे ब्रेकअप झाले़ त्याआधी आदित्य रॉय कपूरसोबत तिचे नाव जोडले गेले होते. तूर्तास श्रद्धाचे नाव रोहन श्रेष्ठासोबत जोडले जात आहे. श्रद्धा व रोहन एकमेकांचे जुने मित्र. पण सध्या हे नाते मैत्रिपलीकडे गेल्याचे कळतेय. खरे तर आत्तापर्यंत दोघांनीही हे रिलेशनशिप उघड होऊ न देण्याचेचं प्रयत्न केलेत. पण शेवटी लपवून-लपवून किती लपवणार. काही प्रसंगी अप्रत्यक्ष का होईना, हे प्रेम जगाला दिसलेय. 

 

टॅग्स :श्रद्धा कपूर