Join us
Daily Top 2Weekly Top 5

​श्रद्धा कपूरने केली आमिर खानची प्रशंसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 18:39 IST

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर महानायक अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणाºया तीन पत्ती या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. ...

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर महानायक अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणाºया तीन पत्ती या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. अमिताभ बच्चन यांची फॅन असलेल्या श्रद्धा कपूरने सुपरस्टार आमिर खानची प्रशंसा केली आहे. श्रद्धा म्हणाली, आमिर खान केवळ प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व नाही तर सामाजिक जबाबदारी जपणारा कलाकार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत श्रद्धाने आमिर खानसोबत काम केलेले नाही, ही प्रशंसा करून ती आपल्यासाठी मार्ग मोकळा करीत असल्याचे मानले जात आहे. ट्विटर हॅशटॅग ‘आस्क श्रद्धा’च्या माध्यमातून अभिनेत्री श्रद्धा कपूरने आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. श्रद्धा कपूर हिला एका चाहत्याने आमिर खान बद्दलचे वर्णन एका शब्दात करायला सांगितले. यावर श्रद्धा म्हणाली, अतिशय प्रेरणादायी, निडर, कलात्मक आणि सामाजिक जबाबदारी जपणारा व्यक्ती. तिने केवळ आमिरची प्रशंसाच केली असे नाही तर अभिनेत्री आलिया भट्टसोबत तिची केली जाणारी तुलना व दोघींमध्ये असलेल्या स्पर्धेवर आपले मौन तोडले. श्रद्धाच्या एका फॉलोअरने तू आलिया भट्ट बद्दल काय विचार करतेस असा प्रश्न विचारला यावर बागीची अभिनेत्री म्हणाली की, २३ वर्षांची आलिया जबदरस्त पटाखा आहे. शाहरुखबद्दल आपले मत मांडताना श्रद्धाने त्याला किंग म्हणून संबोधले. तुझ्यामते बॉलिवूडमध्ये सुपरस्टार कोण आहे असा प्रश्न तिला करण्यात आला यावर श्रद्धा म्हणाली, महानायक अमिताभ बच्चन हे नावच सुपरस्टारची व्याख्या आहे. एबीसीडी या चित्रपटात वरुण धवनसोबत काम करण्याच्या अनुभवाविषी सांगताना श्रद्धा म्हणाली, वरुण केवळ माझा सहकलाकार नाही तर त्याआधी माझ्या लहानपणीचा मित्र आहे. त्याच्याशी माझे खास नाते राहिले आहे.