Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बाहुबली’ प्रभाससोबत नाव जुळताच श्रद्धा कपूरचे वाढले भाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 14:07 IST

काही दिवसांपूर्वीच खुलासा करण्यात आला की, अभिनेत्री अनुष्का शेट्टीऐवजी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ‘साहो’मध्ये रोमान्स करताना बघावयास मिळणार आहे. ...

काही दिवसांपूर्वीच खुलासा करण्यात आला की, अभिनेत्री अनुष्का शेट्टीऐवजी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ‘साहो’मध्ये रोमान्स करताना बघावयास मिळणार आहे. विशेष म्हणजे चाहते दोघांमधील केमिस्ट्री बघण्यास उत्सुक असल्याने ही जोडी बॉक्स आॅफिसवर धूम उडवून देईल, यात शंका नाही. मात्र आता आलेल्या बातमीनुसार श्रद्धाचे नाव प्रभाससोबत जोडले गेल्याने तिने तिचा भाव वाढविला असून, ‘साहो’साठी तिने निर्मात्यांकडे केलेली डिमांड भुवया उंचाविणारी आहे. ‘साहो’ बिग बजेट चित्रपट असून, हिंदी, तामीळ आणि तेलगू भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे. ‘बाहुबली’च्या प्रचंड यशानंतर प्रभास ‘साहो’मधून पुन्हा एकदा आपला जलवा दाखविण्यास तयार आहे. तर यावेळेस त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर रोमान्स करणार आहे. मात्र श्रद्धाने या चित्रपटासाठी निर्मात्यांकडे १२ कोटी रुपयांची डिमांड केली आहे. वास्तविक आतापर्यंत श्रद्धा एका चित्रपटासाठी केवळ तीन कोटी रुपये घेत असायची. मात्र एकदमच तिने १२ कोटी रुपयांची मागणी केल्याने सध्या तिचा भाव वाढल्याची सर्वत्र चर्चा रंगत आहे. दरम्यान, याविषयी श्रद्धाचे म्हणणे आहे की, ‘हा चित्रपट तीन भाषांमध्ये रिलीज होणार आहे, त्यामुळे मी प्रत्येक भाषेसाठी चार कोटी रुपयांची आॅफर केली.’चित्रपटाचे बजेट १५० कोटी रुपये इतके आहे. मात्र अशातही श्रद्धाला १२ कोटी रुपये देणे निर्मात्यांना शक्य नसल्याने त्यांनी ९ कोटी रुपयांवर तडजोड केली आहे. श्रद्धाही ९ कोटी रुपये घेण्यास राजी झाल्याचे समजते. आता ‘बाहुबली’ प्रभासच्या फिसबद्दल सांगायचे झाल्याने त्याने या चित्रपटासाठी तब्बल २५ कोटी रुपये घेतले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार प्रभासने या चित्रपटासाठी श्रद्धाने आॅफर केलेल्या मानधनाच्या तिप्पट म्हणजेच ३० कोटी रुपयांची निर्मात्यांकडे मागणी केली होती. परंतु २५ कोटी रुपयांवर त्याला राजी करण्यात आले. सध्या चित्रपटाची शूटिंग मुंबई येथे सुरू असल्याचे समजते.