Join us

श्रद्धा कपूरने अर्जुन कपूरला दिले मराठीचे धडे!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2017 20:09 IST

आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण करणारी श्रद्धा कपूर हिला मराठी भाषा अन् आपल्या संस्कृतीविषयी विशेष आदर ...

आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण करणारी श्रद्धा कपूर हिला मराठी भाषा अन् आपल्या संस्कृतीविषयी विशेष आदर आहे. याची खास झलक बघावयास मिळाली, ‘हाफ गर्लफ्रेण्ड’च्या सेटवर. शूटिंगदरम्यान ती तिचा सहकलाकार अर्जुन कपूर याला मराठी भाषेचे धडे देताना बघावयास मिळाली. शूटिंगदरम्यान जेव्हा-केव्हा श्रद्धा आणि अर्जुनला रिकामा वेळ मिळत असे तेव्हा ती अर्जुनची शिक्षिका बनत असे. विशेष म्हणजे अर्जुन एखाद्या आज्ञाधारी विद्यार्थ्याप्रमाणे श्रद्धाने दिलेला प्रत्येक धडा नीट समजून घेत असे. आपल्या गुरुकडून मिळत असलेले ज्ञान तो अतिशय लक्षपूर्वक ऐकत असे. याविषयी श्रद्धा सांगतेय की, मी अर्जुनला तोडकी-मोडकी मराठी भाषा शिकविली आहे. तेव्हा श्रद्धाने अर्जुनला म्हटले की सांग, मी तुला काय शिकविले? तर त्याने उत्तर दिले की, ‘तू खूप छान पोरगी आहेस’ अर्जुनच्या या उत्तराने श्रद्धाच्या चेहºयावर लगेचच हास्य फुलले. या संगीतमय रोमॅण्टिक चित्रपटातून पहिल्यांदाच श्रद्धा आणि अर्जुनची जोडी मोठ्या पडद्यावर बघावयास मिळणार आहे. मोहित सुरी या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत असून, बालाजी मोशन पिक्चर्स, मोहित सुरी आणि चेतन भगत या चित्रपटाचे निर्माता आहेत. अर्जुन आणि श्रद्धाची ही अनोखी प्रेमकथा येत्या १९ मे रोजी प्रेक्षकांना पडद्यावर बघावयास मिळणार आहे.