Join us

श्रद्धा कपूरला या अभिनेत्रीच्या बहिणीने दिला झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 12:40 IST

2018 हे वर्ष श्रद्धा कपूरसाठी फारसं बरं नसल्याचे एकंदरीत दिसते आहे. गतवर्षी श्रद्धाचे दोनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले ...

2018 हे वर्ष श्रद्धा कपूरसाठी फारसं बरं नसल्याचे एकंदरीत दिसते आहे. गतवर्षी श्रद्धाचे दोनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले होते. तिने नुकताच श्री नारायण सिंग यांच्या बत्ती गुल मीटर चालू चित्रपट साईन केला आहे. मात्र या चित्रपटात ही तिला यामी गौमतपासून इनसिक्युरीटी वाटत होती. त्यातच सायना नेहवालच्या बायोपिकमधून ही सायनला डच्चू दिल्याचे समजते आहे. सायनाला प्रशिक्षण घेण्यासाठी वेळ लागत असल्याने शूटिंग सुरु करायला उशीर होतो आहे. त्यामुळे निर्मात्यांनी तिच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्याचा विचार करत आहे. हे प्रकरण संपत ना संपत तो पर्यंत श्रद्धा कपूरला आणखीन एक झटका लागला आहे. श्रद्धा कपूर आतापर्यंत एका मेकअप ब्राँडची ब्राँड अम्बेसिडर होती. त्या प्रोजेक्ट मधून ही श्रद्धाला काढून टाकले आहे. तिचा जागा कॅटरिनाची बहिण इसाबेलने घेतली आहे. सुरुवातीला या प्रोजेक्टमध्ये करिना कपूर खान, श्रद्धा कपूर आणि इसाबेल यांना एकत्र ठेवण्याचा निर्णय झाला होता. मात्र नंतर नक्की काय फिसकटंल ते कळले नाही. श्रद्धाचे कॉन्ट्रैक्ट रिन्व्हु करण्यात आले नाही. त्यामुळे आता फक्त करिना कपूर खान आणि इसाबेल या प्रोजेक्टचा भाग असतील.  दरम्यान या ब्राँडसोबत श्रद्धा 2014 पासून काम करत होती. आता श्रद्धाच्या जागी या ब्राँडने इसाबेलची निवड केली. आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत इसाबेल ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.  अनुष्का शर्मा आमि विराट कोहलीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये इसाबेल कॅटरिनासोबत दिसली होती. कॅटरिना कैफ आणि सलमान खान इसाबेलच्या बॉलिवूड मधल्या एंट्रीसाठी अनेक महिन्यांसाठी प्रयत्न करतायेत. सध्या इसाबेल एका चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात आहे. ALSO RAED :  कॅटरिना कैफची बहीण इसाबेल आत्तापासून दाखवू लागलीयं अ‍ॅटिट्यूट! श्रद्धा कपूर सध्या साहोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात ती प्रभासच्या अपोझिट दिसणार आहे. साहोमध्ये श्रद्धाचा डबल रोल असल्याचे ही कळते आहे. हा चित्रपट हिंदी, तामीळ आणि तेलगू भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे. साहो बिग बजेट चित्रपट असून त्याचा बजेट १५० कोटी रुपये इतके आहे.