Join us

​‘राबता’साठी कृतिचे लंडनमध्ये शॉपिंग!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2016 20:49 IST

कृती सेनन ही कालपरवा आलेली अभिनेत्री आज बॉलिवूडची ग्लॅमडॉल झालीय. ‘राबता’ या आऊट अ‍ॅण्ड आऊट रोमॅन्टिक सिनेमाच्या शूटींगमध्ये कृति ...

कृती सेनन ही कालपरवा आलेली अभिनेत्री आज बॉलिवूडची ग्लॅमडॉल झालीय. ‘राबता’ या आऊट अ‍ॅण्ड आऊट रोमॅन्टिक सिनेमाच्या शूटींगमध्ये कृति सध्या बिझी आहे. दिनेश विजन दिग्दर्शित या चित्रपटाची पुढील  टप्प्याची शूटींग बुडापेस्ट(हंगेरी) येथे होते आहे. या शूटींगची तयारी कृतीने कशी करावी, तर लंडनमध्ये शॉपिंग करून. डिझायनर अनीता श्रॉफ अंदाजानियासोबत कृतीने लंडनमध्ये जोरदार शॉपिंग केली. ही सर्व शॉपिंग ‘राबता’साठी केली गेली. अनीता ही निर्माते होमी अदाजानिया यांवी पत्नी आहे. कृती ‘राबता’मध्ये हॉट अ‍ॅण्ड हॉटेस्ट दिसावी, यासाठी अनीता प्रचंड मेहनत घेतेय. या चित्रपटात कृतीच्या अपोझिट सुशांतसिंह राजपूत दिसणार आहे. अलीकडे सुशांत व कृतीचे या चित्रपटातील लूक्स रिलीज केले गेले. त्यावरून तरी अनीताची मेहनत वाया जाणार नाही, एवढे लक्षात येते. ‘राबता’ पुढील वर्षी फेबुवारीत रिलीज होणे अपेक्षित आहे.