अभिनेता आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडनेकर यांच्या आगामी ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली आहे. आयुष्यमानने शुक्रवारी ट्विट करताना म्हटले, ‘शुटिंगचा अनुभव खूपच मजेशीर असा होता.’ त्याने लिहिले की, ‘शुभमंगल सावधान’ची शूटिंग पूर्ण झाली आहे. भूमी पेडनेकर, आर. एस. प्रसन्ना आणि आनंद एल. राय यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता.’
And it's a wrap of Principal Photography for #ShubhMangalSaavdhan. This is the energy, Dil se :) @aanandlrai @ayushmannk @psbhumi Godspeed! pic.twitter.com/tNpfxn66Xm
— R S Prasanna (@rs_prasanna) April 27, 2017
https://twitter.com/rs_prasanna/status/857618929979506688
‘दम लगा के हईशा’ या चित्रपटात या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंत केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा हे दोघे एकत्र येत असल्याने प्रेक्षक त्यांना कितपत पसंत करतील हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. आता प्रेक्षकांनाही या चित्रपटाशी संबंधित घडामोडी समोर येण्याची उत्सुकता लागली आहे.