Join us

'गंगुबाई काठियावाडी'चे शूटिंग झाले पूर्ण, आलिया भटने शेअर केली भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 13:16 IST

'गंगूबाई काठियावाडी'चे शूटिंग संपल्यानंतर आलिया भट्टने चाहत्यांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. शूटिंगलाही बंदी होती. त्यामुळे सिनेइंडस्ट्रीचेही खूप मोठे नुकसाना झाले. अनेक चित्रपटांचे शूटिंग खोळंबले होते. यात आलिया भटचा चर्चित चित्रपट गंगूबाई काठियावाडीचाही समावेश होता. अखेर या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. शूटिंग संपल्यानंतर आलिया भट्टने चाहत्यांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

आलिया भटने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती संजय लीला भन्साळी आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत दिसते आहे. तिने फोटो शेअर करत म्हटले की, आम्ही ८ डिसेंबर २०१९ रोजी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचे शूटिंग सुरु केले होते आणि आता २ वर्षानंतर चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. हा चित्रपट आणि सेट दोन लॉकडाउन आणि दोन वादळांमधून गेले आहेत. मेकिंग दरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेता यांनाही कोरोनाची लागण झाली होती. सेटने अनेक समस्यांचा सामना केला आहे. हा एक वेगळा चित्रपट आहे.

आलिया पुढे म्हणाली की, शूटिंग दरम्यान बरेच काही घडले. हा आयुष्य बदलवणारा अनुभव आहे. संजय सरांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात काम करणे हे माझे स्वप्न होते. महत्त्वाचं म्हणजे आज मी हा सेट एक वेगळी व्यक्ती म्हणून सोडत आहे. खूप प्रेम सर.. धन्यवाद… तुमच्यासारखा खरोखर कोणी नाही. चित्रपट संपतो तेव्हा त्यातील एक भाग संपतो, म्हणून आज मी माझा एक भागही गमावला आहे. गंगू आय लव यू! तुझी आठवण येईल.

टॅग्स :आलिया भटसंजय लीला भन्साळी