दिल्लीत ‘फुकरे २’ची शूटिंग सुरू..
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 15:57 IST
२००३ मधील कॉमेडी चित्रपट ‘फुकरे’ आठवतोयं? मौज-मज्जा, मस्ती यांचे धम्माल पॅकेज असलेला हा चित्रपट. याच चित्रपटाचा आता सीक्वल येतोय. ...
दिल्लीत ‘फुकरे २’ची शूटिंग सुरू..
२००३ मधील कॉमेडी चित्रपट ‘फुकरे’ आठवतोयं? मौज-मज्जा, मस्ती यांचे धम्माल पॅकेज असलेला हा चित्रपट. याच चित्रपटाचा आता सीक्वल येतोय. साहजिकच या सिक्वेलमध्ये नवीन काय असणार, अशी उत्सुकता सर्वांना लागून राहिलीयं. अभिनेता अली फजल याने टिष्ट्वटरवर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे तर ही उत्सूकता शिगेला पोहोलीय.या फोटोत अतिशय हॅप्पी मूडमधील चित्रपटाची अख्खी टीम दिसतेय. फोटोला ‘गेटिंग रेडी टू मेक द स्विच. व्हेरी क्लोज व्हेरी क्लोज. अॅम जॉईनिंग रिचा चढ्ढा, वरूण शर्मा आणि पुल्कित सम्राट सून..’ असे कॅप्शन देण्यात आलेय. त्यामुळेच ही टीम आता पुन्हा एकदा काय धम्माल करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेय. एकंदरित काय तर प्रेक्षकांइतकीच संपूर्ण टीमही ‘फुकरे २’च्या शूटिंगसाठी उत्सुक आहे. मृगदीप सिंग लाम्बा दिग्दर्शित ‘फुकरे’ चित्रपटात मन्जोत सिंग, विशाखा सिंग आणि प्रिया आनंद हे देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.