shocking : टायगर श्रॉफची हिरोईन निधी अग्रवालला घरातून हाकलले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2017 15:20 IST
मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी. मुंबईने अनेकांच्या स्वप्नांना आपल्या कवेत घेतले. अनेकांना उंच शिखरावर नेऊन ठेवले. पण या स्वप्ननगरीत तग ...
shocking : टायगर श्रॉफची हिरोईन निधी अग्रवालला घरातून हाकलले!
मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी. मुंबईने अनेकांच्या स्वप्नांना आपल्या कवेत घेतले. अनेकांना उंच शिखरावर नेऊन ठेवले. पण या स्वप्ननगरीत तग धरणे वाटते तितके सोपे नक्कीच नाही. मुंबईतील सगळ्यांत मोठी समस्या कुठली असेल तर, डोक्यावर छत. होय, मुंबईत घर शोधण्याइतके कठीण दुसरे काहीही नाही. शिवाय तुम्ही बॉलिवूडमधील स्ट्रगलर असाल तर हे अतिकठीण आहे. होय, बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यासाठी मुंबईत आलेल्यांना अनेकजण दूरूनच राम राम ठोकतात. त्यांना भाड्याने घर देण्यात कुणालाही इंटरेस्ट नसतो. स्ट्रगलिंग अॅक्टर्सला मुंबईमध्ये त्यांच्या घरातून हाकलून लावले गेले, अशा बातम्या म्हणूनच अनेकदा कानावर येतात. नेमकी अशीच घटना निधी अग्रवालसोबतही घडली आहे.आता निधी अग्रवाल कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर निधी अग्रवाल हा बॉलिवूडमधील एक उगवता तारा. लवकरच ती तुम्हाला ‘मुन्ना मायकेल’ या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. हा निधीचा पहिला सिनेमा आहे. पण हा सिनेमा रिलीज होण्याआधीच निधीसमोर एक मोठी समस्या उभी राहिली आहे. होय, ती मुंबईत ज्या सोसायटीत राहते, त्या सोसायटीने तिला बळजबरीने घराबाहेर काढले आहे. निधी वांद्रयातील एका सोसायटीत आपल्या काही फ्रेन्डसोबत राहायची. पण आता सोसायटीने निधीला बाहेर काढले आहे. निधीला घरातून का बाहेर काढले तर, निधी सिंगल आहे, म्हणून. मी सिंगल आहे आणि अॅक्ट्रेस आहे, यामुळे सोसायटीवाल्यांना अडचण होती. त्यामुळे त्यांनी मला घरातून बाहेर काढले. आता मला मुंबईत नव्याने घर शोधण्याचे दिव्य पार करावे लागणार आहे, असे निधीने सांगितले.