Join us

SHOCKING : ‘दोन वेळा रेप होऊनही काहीच फील नाही झाले...’ ‘या’ अभिनेत्रीने केले वादग्रस्त वक्तव्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2017 15:16 IST

-Ravindra Moreआपणास आठवत असेलच की, सलमान खानने एकदा बलात्कारावर एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर सलमान खानवर सोशल ...

-Ravindra Moreआपणास आठवत असेलच की, सलमान खानने एकदा बलात्कारावर एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर सलमान खानवर सोशल मीडियातून मोठी टीकाही झाली होती. अशाप्रकारचं वादग्रस्त विधान आता साऊथ सिनेमांमधील अभिनेत्री नित्या मेननने केलं आहे. नित्याचा ‘घटना’ हा तेलगु सिनेमा नुकताच रिलीज झाला. त्यानिमित्ताने ती मुलाखत देत होती. तेव्हा बोलताना ती म्हणाली की, दोनदा माझा रेप झाला, ते ऐकून तिथे उपस्थित सगळे हैराण झाले. नंतर तिने त्यावर स्पष्टीकरण दिले.अभिनेत्री नित्याने नंतर सांगितले की, ती सिनेमा ‘घटना’बद्दल बोलत होती. या सिनेमात अभिनेता नरेशने व्हिलेनचा रोल केला असूण तो दोनदा तिचा रेप करतो. यावरूनच तिने एक वादग्रस्त विधान केलं. ती म्हणाली की, दिग्दर्शकाने रेपचा सीन इतक्या संवेदनशीलतेने शूट केला तरी आपला रेप झाल्यानंतर तसे काहीच फिल होत नव्हते जसे सीन शूट करताना झाले. नित्याच्या या विधानामुळे तिला नाराजी ओढवून घ्यावी लागली. त्यामुळे ती वादात सापडली असून तिच्यावर टिकाही होत आहेत.२९ वर्षीय नित्याचा जन्म बंगळुरू येथे झाला. पुढे तिने पत्रकारितेचे शिक्षण घेतले. एका मुलाखती दरम्यान तिने सांगितले होते की, ती अभिनेत्री नसती तर पत्रकार असती. नित्याने कन्नडा, मल्याळम, तेलगु आणि तमिळ सिनेमांमध्ये कामे केली आहेत. तेलगु सिनेमांसाठी तिला दोनदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. दरम्यान, सलमानच्या ‘सुल्तान’ या सिनेमाच्या शूटींग दरम्यान घेतलेल्या मेहनत आणि थकव्याची तुलना त्याने रेप पिडित महिलेशी केली होती. त्यामुळे त्याला टिकेचा सामना करावा लागला होता. तो म्हणाला होता की, शूटींग दरम्यान सहा तास काम करून जे होत होतं ते अविश्वसनीय होतं. तो १२० किलोच्या व्यक्तीला उचलत होता, खाली फेकत होता आणि असे त्याने १० वेळा लगातार केले होते. शूटींग जेव्हा संपत होती तेव्हा एखादी रेप पिडित महिला चालत आहे असे वाटत होते, असे सलमान म्हणाला होता.