SHOCKING !! अंकितानंतर क्रिती सॅननसोबतही सुशांतसिंह राजपूतचे ब्रेकअप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 11:28 IST
एक हॉट बातमी सध्या बी-टाऊनमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. बातमी आहे, अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री क्रिती सॅनन ...
SHOCKING !! अंकितानंतर क्रिती सॅननसोबतही सुशांतसिंह राजपूतचे ब्रेकअप!
एक हॉट बातमी सध्या बी-टाऊनमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. बातमी आहे, अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री क्रिती सॅनन या दोघांच्या ब्रेकअपची. दचकलात ना? पण होय, सूत्रांचे खरे मानाल तर सुशांत आणि क्रिती या दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत. खरे तर क्रिती आणि सुशांत दोघांनीही ते रिलेशनशिपमध्ये आहेत, याचा कायम इन्कारच केला. आम्ही चांगले मित्र आहोत, एवढेच ते सांगत होते. पण गेल्या वर्षभरापासून दोघेही एकमेकांना डेट करत होते, हे कुणापासूनही लपून राहिलेले नाही. एका मीडिया रिपोर्टनुसार, ‘राबता’च्या सेटवर दोघांची भेट झाली आणि तेथून दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पण सुशांतचे मूड स्विंग्स आणि त्याचा स्वभाव क्रिती फार काळ सहन करू शकली नाही. अखेर हे रिलेशनशिप पुढे नेण्यात अर्थ नाही, हे दोघांनाही कळून चुकले. त्यामुळे त्यांनी रिलेशनशिप संपवण्याचा निर्णय घेतला. सुशांत व क्रितीने रिलेशनशिपबद्दल घोषणा करणे टाळले, कारण त्याहीवेळी दोघे त्यांच्या नात्याबद्दल जरा गोंधळात होते.ALSO READ : सुशांत सिंह राजपूत अन् जॅकलिन फर्नांडिस निघालेत ‘ड्राईव’वर!गतवर्षी सुशांतचे अंकिता लोखंडेसोबत ब्रेकअप झाले होते. याचकाळात सुशांत क्रितीच्या जवळ आला. यानंतर दोघेही अनेकदा अनेक इव्हेंटला एकत्र दिसले. पण आताश: दोघांनी अशा इव्हेंटमध्ये एकत्र जाणे बंद केले आहे. अलीकडे करण जोहरने व्हॅलेन्टाईन डेची पार्टी दिली होती. या पार्टीतही सुशांतने एकटे जाणे पसंत केले होते. लवकरच ‘राब्ता’चे प्रमोशन सुरु होणार आहे. आता ब्रेकअपची बातमी खरी असेल तर क्रिती व सुशांत या प्रमोशनला एकत्र दिसतात की नाही, हे पाहणे रोचक ठरणार आहे.