SHOCKING !! सलमान खानला आहे ‘हा’ गंभीर आजार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2017 11:57 IST
बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खानचा ‘ट्यूबलाईट’ हा सिनेमा येतोय. ईदच्या मुहूर्तावर येणा-या या चित्रपटासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सूक आहे. भारतात ...
SHOCKING !! सलमान खानला आहे ‘हा’ गंभीर आजार!
बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खानचा ‘ट्यूबलाईट’ हा सिनेमा येतोय. ईदच्या मुहूर्तावर येणा-या या चित्रपटासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सूक आहे. भारतात ईदचा अर्थ सलमान खान, असे म्हणायलाही हरकत नाही. प्रेक्षकांनाही ईदच्या मुहूर्तावर सलमानला पाहायला आवडतं. कदाचित हेच कारण आहे की, बॉलिवूडचा कुठलाही दुसरा स्टार हा मुहूर्त साधायचे टाळतो. सध्या सलमान ‘ट्यूबलाईट’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच प्रमोशनचा भाग म्हणून सलमान सध्या अनेक मुलाखती देतो आहे. अशाच एका मुलाखतीत सलमानने असे काही सांगितले की, त्यामुळे त्याच्या चाहत्यांची चिंता वाढणार हे नक्की. होय, तुम्हाला माहित नसेल पण सलमानला श्वास घेण्याचा त्रास आहे. या एका आजारामुळे सलमानला कबीर खानचा एक चित्रपटही सोडावा लागलाय. होय, सलमानने खुद्द ही माहिती दिली. तो म्हणाला की, ‘ट्यूबलाईट’शिवाय कबीर खान आणखी एका चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन माझ्याकडे आला होता. पण मी या चित्रपटाला नकार दिला. कारण त्यातील पात्र मी रंगवूच शकलो नसतो, असे मला वाटले. कारण हा चित्रपट एका म्हाताºया माणसाची कथा होती. या भूमिकेसाठी मला प्रचंड प्रोस्थेटिक वापरावे लागले असते. मला श्वास घेण्यात अडचण होते. माझे ८७ टक्के नाक बंद आहे. त्यामुळे मी हा चित्रपट नाकारला, असे सलमानने सांगितले.सलमानच्या या खुलाशानंतर आपण सगळेच त्याला एकच सल्ला देऊ. असे कितीही चित्रपट हातात जाऊ देत, तू केवळ तुझ्या तब्येतीची काळजी घे,असे आपण सलमानला सांगू. शेवटी काहीही झाले तरी सलमानवरचे चाहत्यांचे प्रेम जराही कमी होणार नाहीयं.