Join us

Shocking : किम शर्मा पैशासाठी नव्हे तर समाधानासाठी करत आहे ‘हे’ काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2017 22:09 IST

अभिनेत्री किम शर्मा सध्या मुंबई येथे असून, फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. किम सध्या आर्थिक अडचणीत सापडली असून, लकरच ती ...

अभिनेत्री किम शर्मा सध्या मुंबई येथे असून, फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. किम सध्या आर्थिक अडचणीत सापडली असून, लकरच ती मुंबईतच एक छोटा-मोठा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहे. आर्थिक चणचणीमुळेच तिने इंडस्ट्रीपासून दूर जात व्यवसाय सुरू करण्यास प्राधान्य दिल्याची चर्चा होती. परंतु किमने या सर्व चर्चा फेटाळून लावत ट्विटरच्या माध्यमातून एक खुलासा केला आहे. त्यामुळे इंडस्ट्रीत तिच्याविषयी भलतीच चर्चा सध्या व्हायरल होत आहे. किम शर्माविषयी अशी चर्चा आहे की, ती सध्या फ्री फंडे काम करीत आहे. कारण या कामाचे तिला पैसे मिळत नसले तरी, समाधान नक्कीच मिळत आहे. आता तुम्ही म्हणाल की, असे कुठले काम आहे की किम पैशांपेक्षा मानसिक समाधानाला महत्त्व देत आहे. तर किम ‘इंडियन डाक्युमेंट्री फाउंडेशन’च्या ‘गुड पिच इंडिया’ या कार्यक्रमाशी जोडली गेली आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासूनच किम या संस्थेबरोबर काम करीत आहे. या सामाजिक संस्थेची स्थापना अभिनेता आणि किमचा जवळचा मित्र जावेद जाफरी याने केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून ती बºयाचशा सामाजिक कार्यक्रमांच्या व्यासपीठावर बघावयास मिळत आहे. किम शर्मा हिला तिच्या पतीने घटस्फोट दिला असून, तो दुसºया महिलेला डेट करीत आहे. त्यामुळेच किम सध्या मुंबईतच वास्तव्य करीत आहे. मात्र याविषयी किमने अद्यापपर्यंत खुलासा केलेला नाही. ‘मोहब्बते’ या चित्रपटातून इंडस्ट्रीत प्रवेश करणाºया किमचे सुरुवातीला क्रिकेटपटू युवराज सिंग याच्याबरोबर अफेयर सुरू होते. त्यामुळे ती चांगलीच चर्चेतही होती. पुढे ती हॉटेल व्यावसायिक अली पुंजानी याच्याशी २०१० मध्ये विवाहबंधनात अडकली. त्यानंतर किम मुंबई सोडून पतीकडे शिफ्ट झाली. किमचा पती अली पुंजानी याने किमबरोबर विवाह करण्यासाठी त्याच्या पहिल्या पत्नीकडून घटस्फोट घेतला होता. किम केनियामध्ये पती अलीचा व्यवसाय सांभाळत होती. मात्र अचानकच ती सर्व काही सोडून मुंबईत परतली आहे. तिचा पतीबरोबर घटस्फोट झाला की नाही, हे मात्र अजूनही कोडेच आहे.