Join us

धक्कादायक, जावेद अख्तरांनी कंगनाला दिली होती धमकी, कंगणा राणौतच्या बहिणीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 15:19 IST

‘क्रिश 3’ सिनेमादरम्यान हृतिक आणि आपल्यात प्रेमसंबंध असल्याचा दावा कंगनाने केला होता. मात्र हृतिकने कंगना खोटे बोलत असल्याचे सांगितले होते.

बॉलीवुडची क्वीन अभिनेत्री कंगणा राणौतने विविध सिनेमांमध्ये दर्जेदार भूमिका साकारत रसिकांची मने जिंकली आहेत. बेधडक आणि बिनधास्त अंदाजामुळे कंगणाच्या सिनेमापेक्षा तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडींचीच चर्चा सर्वाधिक रंगलेली असते. कंगणा आणि वाद हे जणू समीकरणच बनले आहे. कारण पुन्हा एकदा कंगणाचा एक वाद चव्हाट्यावर आला आहे. कंगणाची बहिण रंगोलीने सोशल मीडियावर घडलेला प्रकार प्रकाशझोतात आणला आहे. जावेद अख्तर यांनी कंगनाला घरी बोलावून धमकावले असा आरोप कंगनाची बहीण रंगोली चंडेलने केला आहे. 

जावेद अख्तरांनी एक दिवस कंगना रणौतला त्यांच्या घरी बोलावलं होतं आणि त्यांनी हृतिक रोशनची माफी मागायला सांगितल्याचे तिने म्हटले आहे. रंगोली कंगनाची सख्खी मोठी बहीण तर आहेच शिवाय कंगनाची ती मॅनेजरही आहे. आता अचानक रंगोलीने कंगणा आणि हृतिकचा वाद समोर आणण्याचे नेमके कारण काय हे स्पष्ट झाले नसून यावर आता चर्चा रंगत आहेत.‘क्रिश 3’ सिनेमादरम्यान हृतिक आणि आपल्यात प्रेमसंबंध असल्याचा दावा कंगनाने केला होता. मात्र हृतिकने कंगना खोटे बोलत असल्याचे सांगितले होते.

वेळोवेळी सगळे वाद रंगोली समोर आणत असते हृतिकने कंगणाला मेल केले असल्याचे समोर आले होते. कंगणाच्या बहिणीनेच हृतिकने कंगनाला पाठवलेला एक कथित ई-मेल सार्वजनिक केला होता. ‘तू आणि मी सर्वसामान्य कपल्ससारखे नसून आपले आयुष्य त्यांच्यापेक्षा वेगळे आहे,’ असे हृतिकने या मेलमध्ये म्हटले होते. या ईमेलचा स्क्रिनशॉट रंगोलीने शेअर करत नव्या वादाला तोंड फोडले होते.

टॅग्स :कंगना राणौतजावेद अख्तर