Join us

Shocking! ‘लिपस्टिक अन्डर माय बुरखा’ पास करण्यास सेन्सॉर बोर्डाचा नकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 14:32 IST

गतवर्षी बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी अभिनेत्यांना मागे टाकले. अनेक नायिकाप्रधान चित्रपटांना प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली. बॉलिवूडमध्ये ‘महिलाराज’ आल्याचा फिल त्यामुळे ...

गतवर्षी बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी अभिनेत्यांना मागे टाकले. अनेक नायिकाप्रधान चित्रपटांना प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली. बॉलिवूडमध्ये ‘महिलाराज’ आल्याचा फिल त्यामुळे आला. अनेकांना हा ‘फिल’ सुखावून गेला. पण हे कदाचित गेल्या वर्षभरासाठीच असावे. होय, कारण केवळ नायिकाप्रधान चित्रपट असल्याच्या कारणावरून सेन्सॉर बोर्डाने एका चित्रपटाला सर्टिफिकेट देण्यास नकार दिला आहे. होय, ही बातमी धक्कादायक असली तरी सत्य आहे. दिग्दर्शिक व निर्माते प्रकाश झा निर्मित ‘लिपस्टिक अन्डर माय बुरखा’ या चित्रपटास पास करण्यास सेन्सॉर बोर्डाने नकार कळवला आहे. यामागे बोर्डाने अनेक कारणे दिली आहेत. बोर्डाच्या मते, या चित्रपटाची कथा महिलाप्रधान आहे. यात सामान्य आयुष्यापेक्षा कितीतरी अधिक, अवास्तव अशा कल्पना रंगवलेल्या आहेत. अनेक  सेक्युअल सीन्स, शिव्या, आॅडिओ पोनोग्राफीमुळे हा चित्रपट वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. शिवाय या चित्रपटात समाजाच्या काही अतिसंवेदनशील भागाचा संदर्भ आहे. त्यामुळे 1(a), 2(vii), 2(ix), 2(x), 2(xi), 2(xii) and 3(i) या गाईडलाईनअंतर्गत या चित्रपटास प्रमाणपत्र नाकारण्यात येत असल्याचे बोर्डाने म्हटले आहे.ALSO READ : ‘उडता पंजाब’ लीक!! सेन्सॉर बोर्डाचा बदला??​अधिक वयस्क सामग्रीच्या चित्रपटांना मिळणार ए/सी प्रमाणपत्रनिश्चितपणे सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयाने झा दु:खी आहेत. कॉम्प्लेक्स मुद्यांवर आधारित चित्रपट बनवणाºया फिल्ममेकर्सना मागे ओढण्याचा हा प्रकार आहे. खरे तर एक देश म्हणून अभिव्यक्ति स्वातंत्र्यास आपणास प्रोत्साहन द्यायला हवे. पण सेन्सॉर बोर्डाने याऊलट पाऊल उचलले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया झा यांनी नोंदवली आहे.‘लिपस्टिक अन्डर माय बुरखा’ एक महिलाप्रधान चित्रपट आहे. यात एक महिला पारंपरिक क्रूप्रथांची बेडी तोडून पित्तृसत्ताक समाजाला आव्हान देते. कोंकणा सेन शर्मा, रत्ना पाठक शहा, अहाना कुमरा, प्लाबिता बोरठाकूर यांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.