Shocking!! ऐश्वर्या रायचा आत्महत्येचा प्रयत्न...अफवा व्हायरल!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2016 13:16 IST
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्याबद्दल एक शॉकिंग बातमी सध्या व्हायरल झाली आहे. ऐश्वर्याने अलीकडे आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा यात ...
Shocking!! ऐश्वर्या रायचा आत्महत्येचा प्रयत्न...अफवा व्हायरल!!
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्याबद्दल एक शॉकिंग बातमी सध्या व्हायरल झाली आहे. ऐश्वर्याने अलीकडे आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा यात करण्यात आला आहे. आत्महत्येचे कारणही रोचक आहे. बातमीनुसार, ऐश्वर्या तिच्या वैवाहिक आयुष्याला कंटाळली आहे. त्यामुळेच तिने हे पाऊल उचलले आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये ऐश्वर्याने बोल्ड सीन्स दिले. त्यामुळे बच्चन कुटुंब नाराज आहे. त्यामुळे निराश होऊन ऐश्वर्या आत्महत्येचा प्रयत्न केला, असेही या बातमीत म्हटले आहे.ऐश्वर्याने आपल्या हाताची नस कापून स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. ही बाब बच्चन कुटुंबाच्या लक्षात येताच घरीच डॉक्टर बोलण्यात आले आणि डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केलेत, असे या बातमीत लिहिले आहे. एवढेच नाही तर , ऐश्वर्या शुद्धीवर येताच, मला मरू द्या, मला जगायचे नाही, असे बडबडू लागली, असे यात लिहिले आहे. या बातम्यांसोबत एक फोटोही शेअर करण्यात आला आहे. अर्थात या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसून ती शुद्ध अफवा आहे. हा फोटो १२ वर्षांपूर्वी आलेल्या ‘खाकी’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यानचा आहे. यावेळी एका अनियंत्रित जीपने ऐश्वर्याला धडक दिली होती. या अपघातात ऐश्वर्या रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांमध्ये फेकली गेली होती. यानंतर लगेच ऐश्वर्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.अलीकडे ऐश्वर्याचे सासरे अमिताभ बच्चन यांनी कोलकाता फिल्म फेस्टिवल दरम्यान ‘ऐ दिल है मुश्किल’मधील ऐश्वर्याच्या भूमिकेची तोंडभरून स्तूती केली होती. या चित्रपटातील ऐश्वर्याची भूमिका ‘प्रोग्रेसिव्ह वूमन’ दर्शवणारी आहे, असे त्यांनी म्हटले होते. यावरून तरी ‘ऐ दिल है मुश्किल’मधील ऐश्वर्याच्या बोल्ड दृश्यांमुळे बच्चन कुटुंब नाराज असल्याची बातमी अफवा सिद्ध होते.यापूर्वी ऐश्वर्याचा पती अभिषेक बच्चन यानेही ऐश्वर्याची प्रशंसा केली होती. ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये ऐश्वर्या कमालीची सुंदर दिसते आहे. मी करण आणि या चित्रपटाच्या पूर्ण टीमबद्दल अतिशय आनंदात आहे, असे त्याने म्हटले होते.