Join us  

सलमान खानच्या घरावर गोळीबार, शिव ठाकरेने दिली प्रतिक्रिया; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 11:46 AM

भाईजानच्या जीवाला धोका? शिव ठाकरे म्हणाला...

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) जीवाला धोका निर्माण झाला आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून त्याला अनेकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याहून पुढे जात काल पहाटे बांद्रा येथील त्याच्या गॅलक्सी अपार्टमेंटवर चार गोळ्या झाडल्या गेल्या. या घटनेनंतर परिसरातील वातावरण तापलेलं आहे. सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून दुचाकीवरुन आलेल्या दोन गुंडांचा शोध घेतला जात आहे. या सर्व घटनेमुळे सलमानचे चाहते टेन्शनमध्ये आले आहेत. बिग बॉस 16 चा रनर अप मराठमोळा शिव ठाकरेने (Shiv Thakre) यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अमरावतीचा वाघ शिव ठाकरे सर्वांचाच लाडका आहे. शिव कायम सगळीकडे अॅक्टिव्ह असतो. नुकतंच त्याने मुंबईत आयोजित 'जश्न-ए-ईद-मिलन' इव्हेंटसाठी हजेरी लावली. यावेळी पापाराझींनी त्याला सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराबद्दल विचारलं. तेव्हा तो म्हणाला, "यार मी ऐकल्याप्रमाणे तो सुरक्षित आहे. त्याला काही होणार नाही. त्याच्यावर देवाची कृपा आहे. सगळ्यांचा तो लाडका आहे. चाहत्यांचं त्याला भरपूर प्रेम मिळतं." Instant Bollywood या सोशल मीडिया पेजवर शिव ठाकरेचा व्हिडिओ आहे.

काल नक्की काय घडलं?सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंटवर काल पहाटे ४ च्या सुमारास गोळ्या झाडल्या गेल्या. दुचाकीवर आलेल्या दोन गुंडांचा सध्या शोध घेतला जात आहे. सीसीटीव्हीत त्यांचे चेहरेही दिसले आहेत. या गुंडांनी माऊंट मेरी चर्चच्या इथे दुचाकी सोडली आणि ते बांद्रा स्टेशनला गेले. तिथून ते सांताक्रुझ स्टेशनवर उतरले. यानंतर ते कुठे गेले याचा पोलिसांना पत्ता लागलेला नाही. या घटनेनंतर राज ठाकरेंसह अनेकांनी सलमान खानच्या घरी जात त्याची भेट घेतली.

टॅग्स :शीव ठाकरेसलमान खानबॉलिवूडगोळीबारपोलिसमुंबई