Join us

शिमित अमिन सात वर्षानंतर पुन्हा दिग्दर्शनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 13:20 IST

दिग्दर्शक शिमित अमिन सात वर्षानंतर पुन्हा दिग्दर्शन क्षेत्रात परतत आहे. आदित्य चोपडा सोबत अनेक प्राजेक्टशी ते संबंधी होते. परंतु, ...

दिग्दर्शक शिमित अमिन सात वर्षानंतर पुन्हा दिग्दर्शन क्षेत्रात परतत आहे. आदित्य चोपडा सोबत अनेक प्राजेक्टशी ते संबंधी होते. परंतु, चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचा निर्णय त्यांनी अलीकडेच  घेतला आहे.  या चित्रपटात ते रणवीर सिंह यास लीड रोल मध्ये कास्ट करीत आहेत. हा चित्रपट रोमांटिक राहणार असल्याची चर्चा आहे. मात्र, यासंदर्भात यशराज फिल्मने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. ‘अब तक छप्पन’ ‘ चक दे इंडिया’ रॉकेट सिंह सैल्समैन आॅफ द ईयर’ चे दिग्दर्शीत लवकरच आपला नवीन चित्रपटाचे काम सुरु करणार आहे. दिग्दर्शक अमिन यांनी दिग्दर्शीत केलेला शेवटचा चित्रपटात रणबीर कपूर होता. तर रणवीर सिंहला घेऊन अमिन पुन्हा परतणार आहे. रणवीरला सिंहला सध्याला दिग्दर्शकांची पहिली पसंती आहे. परंतु, यशराज फिल्मनेच रणवीरला पहिल्यांदा ब्रेक दिला होता. हे सुद्धा त्यांच्या चांगलेच आठवणीत आहे.