Join us

​शिल्पा शेट्टी, प्रियांका चोप्रा करणार स्वच्छतेचा जागर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 16:16 IST

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी व प्रियांका चोप्रा हिची निवड भारत सरकारच्या ’स्वच्छ भारत अभियाना’ची ब्रँड अ‍ॅम्बेंसडर म्हणून करण्यात आली ...

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी व प्रियांका चोप्रा हिची निवड भारत सरकारच्या ’स्वच्छ भारत अभियाना’ची ब्रँड अ‍ॅम्बेंसडर म्हणून करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभिनयान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आता विविध संवाद माध्यमातून स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार प्रसार करताना दिसणार आहे. २०१४ साली झालेल्या निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबविण्यास सुरुवात केली होती. या अभियानाअंतर्गत शिल्पा शेट्टी लोकांना रस्त्यावर कचरा टाकण्यापासून परावृत्त करणे, परिसर स्वच्छ ठेवणे, शौचालय बांधने आदीबाबत ती जनजागृती करताना दिसणार आहे. वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ याशिवाय अन्य माध्यमातून लोकांमध्ये स्वच्छतेचा संदेश ती देणार आहे. शिल्पा शेट्टीचा फोटो असलेले स्वच्छ भारत अभियानाचे पोस्टर्सही देशभरात लावण्यात येणार आहे. शहरी विकास मंत्रालयाचे संयुक्त सचिव आणि स्वच्छ भारत अभियानाचे संचालक प्रवीण प्रकाश यांनी याबाबत माहिती दिली. प्रवीण प्रकाश म्हणाले, स्वच्छ भारत अभियानांतर्गत लोकांमध्ये स्वच्छतेविषयीची जागरुकात निर्माण करण्यासाठी भारतीय समाजाच्या ओळखीचा चेहरा हवा होता. शिल्पा शेट्टीची निवड यामुळेच करण्यात आली आहे. आता ती विविध माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणार आहे. आजही आपल्या देशात शहरी भागात रस्त्यावर कचरा टाकणे ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरली जात आहे. विशेष म्हणजे नागरिक डस्टबिनचा वापर न करता तो कचरा खुल्या जागेवर टाकून देतात.याच दरम्याना शहरी विकास मंत्रालयाने अभिनेत्री प्रियंका चोपडालाही स्वच्छता अभियानात सहभागी करून घेतले आहे. प्रियंका चोपडा २०१९ पर्यंत सार्वजनिक जागेवर आणि उघड्यावर शौचास जाण्यापासून नागरिकांना जागरूक करणार आहे. यापूर्वी अमिताभ बच्चन, सलमान खान, शंकर महादेवन आणि सचिन तेंडूलकर यांनाही या अभियानात सहभागी करून घेण्यात आले आहे.