या आंदोलनानंतर शिल्पाने जाहीर माफी मागितली आहे. ‘ मी वापरलेल्या शब्दाचा विपर्यास केला गेला. कुणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने मी तो शब्द वापरला नव्हता. पण तरिही माझ्या शब्दांमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते. विविध जाती आणि पंथांचे लोक राहत असलेल्या आणि वैविध्याने नटलेल्या या देशाची नागरिक असल्याचा मला अभिमान आहे आणि मी त्या सर्वांचा मनापासून आदर करते, असे ट्विट शिल्पाने केले आहे. शिल्पाने वाल्मिकी समाजाची जाहीर माफी मागितली असली तरी सलमानने मात्र अद्याप माफी मागितलेली नाही.
ALSO READ : ‘टायगर जिंदा हैं’ रिलीज होताच झाला कडाडून विरोध, जयपूरमध्ये जाळला सलमान खानचा पुतळा!
‘सुपर डान्सर २’ या रिअॅलिटी शोमध्ये सलमानने त्याच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. या शोमध्ये शिल्पा परीक्षक आहे. याच कार्यक्रमात सलमान आणि शिल्पा शेट्टीने आपल्या डान्स स्टेप्सविषयी सांगताना ‘भंगी’ या शब्दाचा वापर केला होता. मी या स्टे्प्समध्ये ‘भंगी’ दिसेल, असे सलमान म्हणाला होता. यावर, मी घरी अशीच दिसते, असे शिल्पा म्हणाली होती. यामुळे वाल्मीकी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. शिल्पा आणि सलमानने वाल्मिकी समाजाची जाहीर माफी मागावी आणि त्यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणीदेखील या समाजाने केली होती.