Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिल्पा शेट्टीच्या मुलीचा पहिला फोटो आला समोर, पाहा समीशाचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 12:38 IST

शिल्पाच्या मुलीचे नाव समीशा असून तिची छबी नुकतीच फोटोग्राफरने कॅमेऱ्यात कैद केली.

ठळक मुद्देशिल्पा आणि राज यांना 15 फेब्रुवारीला मुलगी झाली असून हे त्यांचे दुसरे अपत्य आहे. शिल्पा आणि राज यांची ही मुलगी सरोगसीच्या माध्यमातून झालेली आहे.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घरी एका नन्ही परीचे आगमन झाले असून त्यांनीच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट त्यांच्या चाहत्यांना सांगितली होती. या बातमीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. आता शिल्पाने तिच्या मुलीला घरी आणले असून शिल्पा, राज त्यांचा मुलगा वियानसोबत चिमुकलीला नुकतेच पाहाण्यात आले. 

शिल्पाच्या मुलीचे नाव समीशा असून तिची छबी नुकतीच फोटोग्राफरने कॅमेऱ्यात कैद केली. तिचा जन्म परदेशात झाला असून तिला घेऊन शिल्पा नुकतीच भारतात परतली आहे. 

शिल्पा आणि राज यांना 15 फेब्रुवारीला मुलगी झाली असून हे त्यांचे दुसरे अपत्य आहे. शिल्पा आणि राज यांची ही मुलगी सरोगसीच्या माध्यमातून झालेली आहे.

शिल्पाने इन्स्टाग्रामवर या नन्ही परीचा फोटो शेअर करत लिहिले होते की, देवाने आमच्या प्रार्थना ऐकल्या असून आमच्या आयुष्यात एक चमत्कार घडला आहे. आम्हाला सगळ्यांना आनंद होत आहे की, आमच्या आयुष्यात एका नन्ही परीचे आगमन झाले आहे. तिचे नाव आम्ही समिशा शेट्टी कुंद्रा असे ठेवले आहे. तिचा जन्म 15 फेब्रुवारी 2020 ला झाला असून आमच्या घरात आता ज्युनिअर एसएसके आली आहे.

राज कुंद्राने ट्वीट करत सांगितले होते की, ही बातमी सांगायला मला किती आनंद होत आहे हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आमच्या घरात एका नव्या सदस्याचे आगमन झाले असून आमच्या मुलीचे नाव समीशा शेट्टी कुंद्रा असे आहे.

शिल्पा आणि राज यांचे लग्न नोव्हेंबर 2009 मध्ये झाले. त्यांना वियान नावाचा मुलगा असून मे 2012 मध्ये त्याचा जन्म झाला आहे.

टॅग्स :शिल्पा शेट्टीराज कुंद्रा