Join us  

अक्षय कुमारमुळे डिप्रेशनमध्ये गेली होती शांतीप्रिया; म्हणाली, घरी जावून आईजवळ तासन् तास रडायची  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 4:22 PM

शांतीप्रिया अक्षयबद्दल जे काही बोलली ते ऐकून सगळेच हैराण झालेत....

ठळक मुद्दे2004 साली तिच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर  कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शांतीप्रियावर आली.

अक्षय कुमारचा डेब्यू सिनेमा ‘सौगंध’ आठवत असेल तर त्यातील हिरोईनही तुम्हाला आठवत असणार. तिचे नाव शांतीप्रिया. ‘सौगंध’ हा शांतीप्रियाचाही पहिला सिनेमा होता. हिच शांतीप्रिया लवकरच ‘बिग बॉस 14’मध्ये  झळकणार असल्याची चर्चा आहे. याचदरम्यान इतक्या वर्षांनंतर शांतीप्रियाने एक धक्कादायक खुलासा केला आहे.नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत शांतीप्रिया अक्षयबद्दल जे काही बोलली ते ऐकून सगळेच हैराण झालेत. अक्षय कुमारमुळे मी डिप्रेशनमध्ये गेली होती, असे ती या मुलाखतीत म्हणाली.

तिने सांगितले, ‘सौगंध’ हा अक्षय व माझा पहिला सिनेमा होता.  चित्रपटाच्या सेटवर अक्षय माझ्या रंगावरून माझी प्रचंड खिल्ली उडवायचा. अगदी 100 लोकांसमोर तो माझ्या रंगावर विनोद करायचा. यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले होते. ‘इक्के पे इक्का’ या सिनेमाच्या सेटवरही तो माझ्या गुडघ्यांवर कमेंट करायचा. माझे गुडघे स्टॉकिंग्सच्या आतही काळे दिसतात कारण तिथे रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत, असे काय काय तो मला बोलला होता. 100 लोकांसमोर त्याने अशापद्धतीने कित्येकदा माझी खिल्ली उडवली. कदाचित मला दुखवायचा त्याचा इरादा नव्हता. पण मी आतून प्रचंड दुखरवले होते. सेटवरून आले की, तासन् तास मी माझ्या आईजवळ रडत बसायचे. या सगळ्या गोष्टींमुळे बराच काळ मी डिप्रेशनमध्ये गेले होते. 

अर्थात आता मी त्या सगळ्या गोष्टी विसरले आहे. मी त्याची तक्रार करत नाहीये. अक्षय आजही माझा चांगला मित्र आहे. मी कमबॅक करतेय, हे अक्षयला कळले तेव्हा त्याने मला पूर्ण पाठींबा दिला. मी तुझ्यासोबत आहे, असे तो मला म्हणाला.

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षयचा १९९१ साली प्रदर्शित झालेल्या ‘सौगंध’ या चित्रपटात अक्षयने एका गरीब मुलाची भूमिका साकारली होती.   हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरला नाही. मात्र या चित्रपटामुळे अक्षय कुमारला ओळख मिळाली.  

‘सौगंध’मधील अक्षय व शांतीप्रिया यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली होती. या चित्रपटात अक्षय व शांतीप्रियाचा बोल्ड किस सीनदेखील त्यावेळी खूप चर्चेत आला होता. हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतरही अक्षयला खिलाडी सीरिजने फेमस केले आणि स्टार बनविले. मात्र शांतीप्रिया स्ट्रगल करत राहिली.

 शांतीप्रिया बॉलिवूडमध्ये कमाल दाखवू शकली नाही. तिने1999 साली  सिद्धार्थ रेसोबत १९९९ साली लग्न केले आणि बॉलिवूडला अलविदा केले. 2004 साली तिच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर  कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शांतीप्रियावर आली. शांतीप्रियाला दोन मुलांनादेखील सांभाळायचे होते आणि हा विचार करत तिने 2008 साली कमबॅक केले होते. माता की चौकी आणि द्वारकाधीश या सारख्या मालिकेत तिने काम केले. मात्र यानांतर ती पुन्हा गायब झाली. आता ती पुन्हा कमबॅकसाठी उत्सुक आहे.

टॅग्स :अक्षय कुमार