Join us

29 वर्षीय शेन जॉन्सनचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:33 IST

29 वर्षीय शेन जॉन्सनचा मृत्यूसंगीतकार जॉन्सन मास्टर यांची पुत्री 29 वर्षीय शेन जॉन्सन चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत सापडली. ...

29 वर्षीय शेन जॉन्सनचा मृत्यूसंगीतकार जॉन्सन मास्टर यांची पुत्री 29 वर्षीय शेन जॉन्सन चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत सापडली. ती रेकॉर्डिंगसाठी येथे आली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 4 फेब्रुवारीला ती रेकॉर्डिंगनंतर हॉटेलमध्ये परत आली होती. 5 फेब्रुवारीला आपले काम संपवून ती परत जाणार असल्याचे सांगण्यात येते. शेनला हृदय विकाराचा झटका आला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.शेनचे वडील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त संगीतकार होते, त्यांचा 2011 साली मृत्यू झाला, तर तिचा भाऊ रेन जॉन्सनचा 2012 साली एका अपघातात मृत्यू झाला. ती आपल्या आईसोबत राहत होती. नुकतेच दोघी माय-लेकींनी त्रिसूर येथे घर घेतले होते. शेन हिला तिच्या वडिलांनी शास्त्रीय संगीताचे धडे दिले होते. वडिलांच्या व भावाच्या मृत्यूनंतर कुुटुंबाची जबाबदारी शेनवर आली होती. मागील काही वर्षांत शेन हिने गायकी व संगीत क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. तिच्या मृत्यूने एक चांगली गायक व संगीतकार दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतून हरपल्याचे बोलले जात आहे.