शाहरूखचा मुलगा आर्यन खान याच्या बॉलिवूड डेब्यूविषयी इथे आहे खास माहिती!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2016 12:42 IST
शाहरूख खान याचा मोठा मुलगा आर्यन खान बॉलिवूडमध्ये येणार, हे तर पक्के आहे. पण केव्हा? हा खरा प्रश्न आहे. ...
शाहरूखचा मुलगा आर्यन खान याच्या बॉलिवूड डेब्यूविषयी इथे आहे खास माहिती!!
शाहरूख खान याचा मोठा मुलगा आर्यन खान बॉलिवूडमध्ये येणार, हे तर पक्के आहे. पण केव्हा? हा खरा प्रश्न आहे. सध्या आर्यनच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल ब-याच चर्चा रंगताहेत. आर्यन अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिच्यासोबत बॉलिवूड डेब्यू करणार, अशी बातमी मध्यंतरी आली. यानंतर आर्यन नव्यासोबत नाही तर श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूरसोबत डेब्यू करणार, अशीही चर्चा रंगली. पण या चर्चांपलीकडे आम्ही तुमच्यासाठी आर्यनच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल सगळी माहिती घेऊन आलेलो आहोत. होय, आर्यनचा गॉडफादर करण जोहर याने आर्यनच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल खास खुलासा केला आहे. एका मुलाखतीत करणने, हा खुलासा केला. आर्यन जेव्हा केव्हा बॉलिवूड डेब्यू करणार, त्यात माझे सर्वात मोठे योगदान असेल. तो माझा मुलगा आहे. त्याला लॉन्चिंगबद्दल माझ्या मनात अनेक इच्छा आहेत, असे करण जोहरने या मुलाखतीत सांगितले. मी आर्यनच्या लहानपणापासून त्याच्यावर नजर ठेऊन आहे. जो सोशल मीडियावर कुठलाही नवा फोटो टाको. हा फोटो कुठला? त्यातली ती कोण? कुठे मैत्री झाली? असे सगळे प्रश्न शाहरूख विचारण्याआधी मीच आर्यनला विचारतो. मी त्याला माझ्या कडेवर खेळवले आहे. त्यामुळे माझ्यासाठी त्याचे लॉन्च विशेष असेल, असेही करण म्हणाला.सध्या आर्यन लंडनमध्ये चार वर्षाचा कोर्स करतोय. त्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली तर त्याच्या लॉन्चची सगळी जबाबदारी माझी असेल. माझ्या मते, आर्यन आणि शाहरूख एकाच फ्रेममध्ये धमाकेदार दिसतील. अर्थात ती नंतरची गोष्ट आहे. पण आर्यनच्या बॉलिवूड डेब्यवेळी त्याच्यापेक्षा मीच अधिक नर्व्हस असेल, असेही करण म्हणाला.एकंदर काय, तर करण इतका उत्सूक आहे म्हटल्यावर आर्यन खान त्याच्याच चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार, हे पक्के समजायले हवे. होय ना?