इन्स्टंट पास्ता वा नूडल्स असे काहीतरी बनवतानाचा तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत सुहाना गोड हसतेय. तिने यात ब्लॅक जॅकेट घातलेले दिसतेय. सुहानाचा हा फोटो बघता, कुकिंग हा तिचा आवडीचा विषय असावा, असे दिसतेय.
अलीकडे ख्रिसमस व न्यू ईअरच्या सुट्ट्यांमध्ये सुहाना भारतात आली होती. सुहाना लंडनमध्ये शिकते तर तिचा भाऊ आर्यन खान हा अमेरिकेत शिकतोय. सुट्टी संपल्यानंतर हे दोघेही अनुक्रमे लंडन व अमेरिकेला रवाना झाले आहेत. खुद्द शाहरूखने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली होती. दोन्ही मुलांसोबतचा एअरपोर्टवरचा सेल्फी पोस्ट करत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. सुट्टी संपल्यावर मुलांना एअरपोर्टवर सोडताना खूप वाईट वाटते, असे त्याने लिहिले होते.
ALSO READ : शाहरूख खानची प्रिंसेस सुहानाच्या या फोटोंची इंटरनेटवर धूम!!
काही दिवसांपूर्वी आई गौरी खानने सुहानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोतील ब्लॅक कलरच्या ड्रेसमुळे सुहानाला ट्रोल व्हावे लागले होते. ट्रोलर्सने धर्माचा दाखला देत सुहानाला असे कपडे न घालण्याचा सल्लाही दिला होता. पित्याप्रमाणेच सुहाना सुद्धा बॉलिवूडमध्ये करिअर करू इच्छिते. पण तूर्तास तिचा सगळा फोकस शिक्षणावर आहे. खुद्द शाहरूखचा तसा आग्रह आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच आपल्या मुलांनी त्यांची इच्छा असेल तर बॉलिवूडमध्ये यावे, असे शाहरूखचे मत आहे.