Join us

शाहरुखची रोहितवर कुरघोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:32 IST

शाहरुख खानच्या आगामी 'दिलवाले' चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. रेडचिली इंटरटेन्मेंट सिनेमाचा 'ट्रेलर' प्रदर्शित झाला आहे. मात्र, त्यापूर्वी ...

शाहरुख खानच्या आगामी 'दिलवाले' चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. रेडचिली इंटरटेन्मेंट सिनेमाचा 'ट्रेलर' प्रदर्शित झाला आहे. मात्र, त्यापूर्वी त्याचे पोस्टर प्रकाशित करू नका, अशी सूचना दिग्दर्शक रोहित शेट्टीने सर्वांना केली होती. मात्र, शाहरुखने त्याकडे दुर्लक्ष करीत पोस्टरवरील चेहर्‍यांवर हात झाकून अर्धवट पोस्टर प्रसिद्ध केले. अर्थात त्यामागे रोहित शेट्टीची सूचना आम्ही पाळल्याचे त्याने दाखवून दिले. काजोल, वरुण धवन, कीर्ती सेन यांचे चित्र पोस्टरवर आहे. तसेच त्याची प्रदर्शित होण्याची तारीख १८ डिसेंबरही दिसत आहे. रोहितची सूचना मान्य मात्र आम्ही पुन्हा पुन्हा असेच करू, असे शाहरुख गमीतने सांगत आहे.शाहरुख आणि काजोलची प्रमुख भूमिका असलेला रोमॅन्टिक दिलवाले त्यांच्या जुन्या दिलखेचक अदा आणि केमिस्ट्रीसह पुन्हा रसिकांसमोर येत आहे.