शाहरूख खानच्या घरी ‘सूपरवूमन’ घेणार पाहुणचार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2017 14:29 IST
शाहरूख खान म्हणजे बॉलिवूडचा किंगखान. जगाच्या पाठीवर त्याच्या चाहत्यांची मोजदादच नाही. पण पुढल्या महिन्यात शाहरूखच्या घरी असा पाहुणा येणार ...
शाहरूख खानच्या घरी ‘सूपरवूमन’ घेणार पाहुणचार!
शाहरूख खान म्हणजे बॉलिवूडचा किंगखान. जगाच्या पाठीवर त्याच्या चाहत्यांची मोजदादच नाही. पण पुढल्या महिन्यात शाहरूखच्या घरी असा पाहुणा येणार आहे, ज्या पाहुण्यांचा खुद्द शाहरूख आणि त्याची बच्चे कंपनी जबरदस्त फॅन आहेत. होय, या पाहुण्याचे नाव ऐकून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. या पाहुण्याचे नाव आहे, लिली सिंह. होय, यू ट्युब सेन्सेशन लिली सिंह. जगभरातील अनेकांचा आदर्श असणारी लिली शाहरूखच्या बंगल्याला भेट देणार आहे. लिली सिंह सध्या वर्ल्ड टूरवर आहे. या टूरदरम्यान लिली भारताच्या तीन शहरात तिचे शो करणार आहे. सुपरवूमन नावाने ओळखली जाणारी लिली सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रीय आहे. तिचे फॅन फॉलोर्इंग खूप मोठे आहे. यात शाहरूखच्या मुलांचा क्रमांक सगळ्यात वरचा म्हणायला हवा. येत्या १९ एप्रिलला लिली मुुंबईत येणार आहे. यावेळी ती शाहरूखच्या घरी पाहुणचार घेईल. आता शाहरूख व त्याची मुले लिलीचे स्वागत कसे करतात, ते आपण पाहुच. अर्थात या पाहुणचाराची बित्तंबातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच.लिलीच्या वर्ल्ड टूरचा मॅनेजर फ्रान्सिस याने सांगितले की, लिली जगभरातील लोकांसाठी एक प्रेरणास्रोत आहे. डिप्रेशनमधून स्वत:ला बाहेर काढण्यापासून ते जगात स्वत:चे एक वेगळे अस्तित्व निर्माण करण्यापर्यंत तिने प्रचंड मेहनत केली आहे. अनेक बॉलिवूड स्टार्स तिला भेटण्यास उत्सूक असतात. पण यावेळी लिली शाहरूखला भेटणार आहे. लिलीच्या भारतदौºयात तिला भेटणारा शाहरूख हा पहिला बॉलिवूड सेलिब्रिटी असेल.लिलीचा पहिला शो १९ एप्रिलला मुंबईत होणार आहे. दुसरा शो २० एप्रिलला हैदराबादेत तर तिसरा शो २१ एप्रिलला दिल्लीत होणार आहे.