शाहरुख खानची मुलगी सुहाना खान दिसली 'या' दिग्दर्शकाची ऑफिसमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2017 17:30 IST
सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सचा डेब्यू जोरात चालू आहे. दररोज एक स्टार किड्सच्या डेब्यूची चर्चा होते आहे. सध्या बॉलिवूडचा किंग ...
शाहरुख खानची मुलगी सुहाना खान दिसली 'या' दिग्दर्शकाची ऑफिसमध्ये
सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सचा डेब्यू जोरात चालू आहे. दररोज एक स्टार किड्सच्या डेब्यूची चर्चा होते आहे. सध्या बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या फॅन्ससाठी एक गूडन्यूज आहे. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान एका दिग्दर्शकाच्या ऑफिसमध्ये दिसली आहे. ज्यानंतर असा तर्क लावण्यात येतो आहे की सुहानाचा लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू होणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सुहाना कोणत्या दिग्दर्शकाच्या ऑफिसमध्ये दिसली तर तो दुसरा तिसरा कोणी नसून शाहरुखचा जीवलग मित्र करण जोहर आहे. डीएनए या वृत्तपत्रात आलेल्या वृत्तनुसार सुहाना खान नुकतीच करण जोहरच्या ऑफिसमध्ये दिसली होती. त्यावेळी तिच्यासोबत प्रोफेशनल हेअर स्टायलिश आणि मेकअप आर्टिस्टसुद्धा उपस्थित होते. एक मोठ्या फोटोग्राफर कडून तिचे फोटोशूट सुद्धा करण्यात आले. ALSO READ : View Pics : मित्र अहान पांडेसोबत सिनेमा बघायला गेली होती शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान!याआधी शाहरुख खानने सुद्धा ही गोष्ट स्वीकारली आहे की, सुहानाला आयुष्यात एक यशस्वी अभिनेत्री बनायचे आहे. त्यामुळे कदाचित सुहानाने त्यादिशेने प्रयत्न सुद्धा सुरु केले असतील. पण करण जोहरच सुहानाला बॉलिवूडमध्ये लाँच करेल असे आमचे म्हणणे नाही मात्र तिला लाँच करण्यात करण जोहरचे मोठे योगदान असेल हे मात्र नक्की. करण जोहरने आलिया भट्ट, वरुण धवन या स्टार किड्सने बॉलिवूडमध्ये लाँच केले आहे. सध्या सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि श्रीदेवीची कन्या जान्हवी कपूर यांच्या बॉलिवूड डेब्यूची जोरदार चर्चा आहे. सारा अली खान सुशांत सिंग राजपूतसह केदारनाथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष शाहरुख खानच्या मुलीच्या डेब्यूकडे लागले आहे. .