Join us
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! शाहरुख खानच्या अभिनेत्रीला झाला कोरोना, बॉलिवूडमध्ये कोरोनची दहशत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 10:41 IST

मार्चमध्ये जयपूरला गेली होती ही अभिनेत्री.

निर्माते करीम मोरानी यांची लहान मुलगी शजा मोरानीची कालच कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. फिल्मीबिटच्या रिपोर्टनुसार शजाची मोठी बहीण अभिनेत्री जोया मोरानीची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. सुरुवातील जोयाचे रिपोर्ट नेगेटीव्ह आले तर शजाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह.त्यानंतर शजाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या दोनही बहिणींवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.  

जोया आपल्या करिअरची सुरुवात शाहरुख खान प्रोडक्शनच्या अंतर्गत तयार झालेल्या ऑल्वेज कभी कभी सिनेमातून केली होती.    

सध्या संपूर्ण मोरानी कुटुंब कोरोनाच्या दहशतीखाली आहे. कुटुंबातील 9 लोकांनी स्वत:ला ऑयसोलेशनमध्ये ठेवले आहे. शजा आणि जोया दोघांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे सगळेच टेन्शनमध्ये आहेत.

 करीम मोरानी यांच्या भावाने स्पॉटबॉयने दिलेल्या मुलाखतीनुसार, जोया मार्च मध्ये जयपूरला गेली होती तर शजा श्रीलंकेला गेली होती. रिपोर्टनुसार मोरानी यांचं जुहूमधले घर लॉकडाऊन करण्यात आले आहे. मोरानी हे बॉलिवूडमधील मोठ्या निर्मात्यांपैकी एक आहेत. शाहरुख खानसोबत त्यांची चांगली मैत्री आहे. शाहरुखच्या अनेक सिनेमांचे ते निर्माते आहेत. 2015 मध्ये आलेल्या 'दिलवाले' सिनेमाची निर्मिती देखील त्यांनी केली होती.

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याशाहरुख खान