Join us

देवदासच्या शूटिंग दरम्यान एका घटनेने वैतागला होता शाहरुख खान, १९ वर्षानंतर सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 12:47 IST

Devdas चित्रपटात शाहरुख खानसोबत ऐश्वर्या राय 'पारो'च्या भूमिकेत होती, तर माधुरी दीक्षित 'चंद्रमुखी'च्या भूमिकेत होती.

आपल्या अभिनयाने शाहरुखने रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं आहे. कुणी त्याला बादशाह म्हणतं, तर कुणी रोमान्सचा किंग. शाहरुख खान पुन्हा एकदा चर्चत आला आहे.संजय लीला भन्साळी यांचा 'देवदास' चित्रपट प्रदर्शित होऊन 19 वर्षे झाली आहेत. १९ वर्षांनंतरही 'देवदास' चित्रपटाची जादू प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. चित्रपटाची कथा, कलाकारांचा उत्तम अभिनय आणि डोळे दिपवणारा भव्य सेट या सगळ्या गोष्टींंमुळे चित्रपट समीक्षकांसह रसिकांच्याही पसंतीस पात्र ठरला होता. 

या चित्रपटात शाहरुख खानसोबत ऐश्वर्या राय 'पारो'च्या भूमिकेत होती, तर माधुरी दीक्षित 'चंद्रमुखी'च्या भूमिकेत होती. अनेकदा कलाकारांना चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान वेगवेगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. असाच काहीसा किस्सा किंग खान शाहरुखने सुद्धा सांगितला होता.शूटिंगरम्यान शाहरुख खान चित्रपटाच्या सेटवर घडणाऱ्या एका घटनेने प्रचंड वैतागला होता.तब्बल १९ वर्षानंतर त्याने याविषयी खुलासा केला होता.सोशल मीडियावर चाहत्यांसह त्याने शूटिंगदरम्यानचे काही फोटो शेअर करत तो किस्सा सांगितला होता.

शाहरुखने सांगितले होते की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सर्व काही ठीक होते. पण एका गोष्टीने तो खूप त्रस्त  झाला होता.या चित्रपटात शाहरुख बंगाली व्यक्तीची भूमिका साकारली होती. यासाठी त्याला बंगाली पारंपारिक पोशाख परिधान करावा लागायचा. अनेकदा चित्रपटाचे शूटिंग हे कधी रात्री उशीरा संपायचे तर कधी कधी सकाळी लवकर शूटिंगला सुरुवात करावी लागायची. ही भूमिका करणं आव्हानात्मक वाटत असलं तरी सहकलाकारांमुळेच मी करु शकलो. याचे श्रेय मी माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय, जॅकी श्रॉफ, किरण खेर यांनाच देतो. 

शाहरुखची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्याला परिधान करावे लागणारे धोतर होते. वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल, पण त्या धोतरमुळे शाहरुख प्रचंड त्रस्त होता. संपूर्ण चित्रपटात धोतरच सगळ्यात जास्त अडचणीत आणणारी होती. शूटिंग दरम्यान अनेकदा हे धोतर सांभाळणे कठीण जायचे. कधी सुटेल याची त्याला सतत भीती असायची आणि असे अनेकदा धोतर सुटलेही आहे. त्यामुळे अभिनय करताना तो अजिबात कन्फर्टेबल नसायचे असेही त्याने सांगितले होते. 

टॅग्स :शाहरुख खानसंजय लीला भन्साळी