Join us

शाहरूख खान सांगतोय, इम्तियाज अलीच्या नव्या चित्रपटाविषयी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2017 18:08 IST

सुपरस्टार शाहरूख खान आणि दिग्दर्शक इम्तियाज अली एका चित्रपटांमध्ये काम करीत आहेत. किंग खानने ट्विटरवर एक छायाचित्र शेअर केले ...

सुपरस्टार शाहरूख खान आणि दिग्दर्शक इम्तियाज अली एका चित्रपटांमध्ये काम करीत आहेत. किंग खानने ट्विटरवर एक छायाचित्र शेअर केले आहे. यात इम्तियाज अली सायकलवर प्रवास करताना दिसतो आहे, शाहरूख बहुदा पाठीमागे कारमध्ये बसला आहे.  शाहरूख लिहितो, ‘उशिरा रात्री माझा दिग्दर्शक इम्तियाज अलींसोबत काही चर्चा. तो म्हणतो, सध्या मी ‘हायवे’ वर ‘तमाशा’ करतो आहे. ‘द रिंग’ नावाच्या या चित्रपटात शाहरूख इम्तियाज अलींसोबत काम करतो आहे. यामध्ये अनुष्का शर्मा ही देखील असणार आहे. यापूर्वी ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटात दोघांनी काम केले आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरूखने त्याच्या आगामी चित्रपटाविषयी लिहिले होते. यामध्ये त्याने लिहिले होते, ‘मी वाढत असताना तुम्ही सेटवर मला आणि माझ्या लेदर जॅकेटला पाहू शकता.’ येत्या ११ आॅगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर सलमान खानने देखील शेअर केले होते.  या अर्थात याचे नाव काय असेल याविषयी अजूनही माहिती नाही. या चित्रपटाचे शूटिंग प्राग, अ‍ॅमस्टरडॅम आणि बुडापेस्टमध्ये झाले आहे. शाहरूख खानच्या रेड चिलीज एन्टरटेन्मेंटने याची निर्मिती केली आहे.